लग्न झालेल्या प्रेयसीसोबत बेडरुममध्ये प्रियकर, तितक्यात नवरा दारात, पुढं जे घडलं त्यानं भंडारा हादरला

लग्न झालेल्या प्रेयसीसोबत बेडरुममध्ये प्रियकर, तितक्यात नवरा दारात, पुढं जे घडलं त्यानं भंडारा हादरला
Husband Attack On Gym Owner

बाल्कनीतून पळण्याच्या गडबडीत प्रियकराचा पाय घसरला आणि तो थेट सिमेंटच्या रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्युमुखी पडला. (Bhandara Boyfriend girlfriends balcony)

अनिश बेंद्रे

|

Jan 27, 2021 | 9:04 AM

भंडारा : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असताना अचानक पती आल्यामुळे प्रियकराची गडबड उडाली. घरातून पळ काढण्याच्या धावपळीत प्रियकराचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे 36 वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले. (Bhandara Boyfriend dies while running from married girlfriends balcony)

पतीने दार वाजवताच भंबेरी

महेश वसंत डोंगरवार हा तरुण विवाहित प्रेयसीला भेटायला गेला होता. भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची भेट घेण्यासाठी महेश मध्यरात्री गेला होता. महेश आणि संबंधित विवाहिता बेडरुममध्ये असताना अचानक दार वाजलं आणि दोघांची भंबेरी उडाली.

बाल्कनीतून पळण्याची घाई अंगलट

विवाहित प्रेयसीच्या पतीची अचानक एंट्री झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. महेश तातडीने बेडरुममधून बाल्कनीत पळाला. दरवाजा लावत खाली उतरण्याची त्याने घाई केली. या गडबडीत महेशचा पाय घसरला आणि तो थेट सिमेंटच्या रस्त्यावर पडला.

प्रेयसीच्या तक्रारीनंतर पोलिसात नोंद

अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली थेट रस्त्यावर पडल्यामुळे महेशला जबर मार बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विवाहित प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरुन भंडारा शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे. (Bhandara Boyfriend dies while running from married girlfriends balcony)

नागपुरात ‘वेगळं काहीतरी’ करताना तरुणाचा मृत्यू

पॉर्न फिल्म पाहून वेगवेगळ्या सेक्स पोझिशन करुन बघण्याच्या नादात नागपुरात तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. संबंधित युवक-युवतीने सात जानेवारीला बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होता. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवर गेले. रुम बुक करुन दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दोघांनी दोरीचा उपयोग केला होता.

दोर आवळल्याने गळफास

तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याभोवतीही आवळली गेली. सेक्सनंतर तरुणी बाथरुममध्ये गेली असताना तरुण खुर्चीसह खाली कोसळला. यामध्ये त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

पती परस्त्रीचा फोटो पाहताना पत्नीचा चाकू हल्ला; सत्य समोर येताच…

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

(Bhandara Boyfriend dies while running from married girlfriends balcony)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें