दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 27, 2021 | 8:40 AM

जेव्हा लग्न होतं तेव्हा प्रत्येकजण एकमेकांच्या आवडी-निवडीची विशेष काळजी घेतात. पण जेव्हा नातं जुनं होतं तेव्हा मात्र छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्यास सुरुवात होते. यात संशय हा नात्यामधला सगळ्यात मोठा शत्रू आहे.

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य
Follow us

मेक्सिको : पती-पत्नीमधलं नातं सगळ्यात अनोखं असतं. या नात्यामध्ये जेवढं प्रेम असतं तितकेच वादही असतात. खरंतर, जेव्हा लग्न होतं तेव्हा प्रत्येकजण एकमेकांच्या आवडी-निवडीची विशेष काळजी घेतात. पण जेव्हा नातं जुनं होतं तेव्हा मात्र छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्यास सुरुवात होते. यात संशय हा नात्यामधला सगळ्यात मोठा शत्रू आहे. यामुळे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये संशयावरून पत्नीने थेट पतीवर चाकू हल्ला केला. पण सत्य काही वेगळंच होतं. (angry wife attack on husband because he was watchin another lady picture later revealed the secret of photo)

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका महिलने तिच्या पतीवर चाकू हल्ला केला. कारण, पती मोबाईलमध्ये एका स्त्रीचा खासगी फोटो पाहत होता. यामुळे पत्नीला राग अनावर झाला आणि तिने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. पण यानंतर जे सत्य समोर आलं, ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. यामध्ये पतीची काहीही चूक नव्हती हे लक्षात आल्यानंतर महिलेलाही मोठा धक्का बसला.

ते झालं असं की पती ज्या महिलेचा फोटो पाहत होता ती दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची पत्नीच होती. ही धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक लोक या बातमीला शेअर करत आहेत. मेस्किकोमध्ये झालेल्या या प्रकारामुळे संशय घेणं किती वाईट आहे याचा अंदाज तुम्ही लावूच शकता.

फोटोमुळे झाला गैरसमज

महिलेने फोटोकडे नीट न पाहताच पतीवर रागाने हल्ला केला. सुदैवाने पतीने वेळीच तिला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पत्नीला शांत केल्यानंतर पतीने तिला फोटो दाखवले. तेव्हा ते फोटो पत्नीचेच होते. इतकंच नाही तर पती जो फोटो पाहत होता तो त्यांच्या लग्नाच्या आधीचा असल्याचं पत्नीने माध्यमांना सांगितलं. तेव्हा आमचं लग्न झालं नसून आम्ही डेट करत होतो. तेव्हाची ही आठवण असल्याचं तिने स्पष्ट केलं.

असे अनेक जुने फोटो पतीने जुन्या ईमेलमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. पत्नीची आठवण आली की तो या फोटोंना पाहत असतो. पण हेच फोटो त्याच्यावर एक दिवस संकट ओढावतील याचा त्याने विचारही केला नव्हता. (angry wife attack on husband because he was watchin another lady picture later revealed the secret of photo)

संबंधित बातम्या –

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ

धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला मृतदेह

पुण्यात जमिनीच्या वादात वाहिला रक्ताचा पाठ, पुतण्यानेच केली चुलतीची निर्घृण हत्या

(angry wife attack on husband because he was watchin another lady picture later revealed the secret of photo)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI