धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला मृतदेह

धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला मृतदेह
आगामी निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. अशात भाजपने पक्षातील अनुभवी आणि विश्वासपात्र नेत्यांकडे जबाबदारी देण्यास सुरुवात केली आहे.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गावातील विद्यमान प्रमुखांच्या कुटुंबानेच राजकीय प्रतिस्पर्ध्यामुळे जागेश्वर यांची हत्या केल्याचा आरोप केला त्यांच्या मुलाकडून करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 26, 2021 | 1:30 PM

अमेठी : अनेक राज्यांमध्ये निवडणुकांचं वादळ सुरू आहे. अशात गुन्ह्याची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी आहे. 64 वर्षीय जागेश्वर वर्मा यांच्या हत्येमुळे आजूबाजूच्या भागात खळबळ उडाली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गावातील विद्यमान प्रमुखांच्या कुटुंबानेच राजकीय प्रतिस्पर्ध्यामुळे जागेश्वर यांची हत्या केल्याचा आरोप केला त्यांच्या मुलाकडून करण्यात आला आहे. वर्मा यांच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांविरूद्ध एफआयआरही दाखल केला आहे. (uttar pradesh news bjp leader jageshwar verma shot dead in amethi )

अमेठी जिल्ह्यातील (अमेठी) मोहनगंज पोलीस स्टेशन भागात सोमवारी ही घटना घडली. जागेश्वर वर्मा यांच्या हत्येप्रकरणी सध्याची प्रमुख अंकिता सिंह तिचा पती दान बहादुर सिंह, भाऊ वीर बहादुर सिंह आणि मुलगा अखिलेश प्रताप सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या हे तिघेही फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वर्मा यांच्या कुटुंबीयांशी बोलून आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जागेश्वर वर्मा हे रविवारी सकाळी घरातून निघाल्यानंतर रात्री 9 वाजले तरी घरी परतले नाहीत. त्यांना वारंवार फोन केला असता त्यांनी उचलला नाही. अखेर कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला. यावेळी घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर जागेश्वर यांचा मृतदेह सापडला. अतिशय निर्घृणपणे त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जागेश्वर यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक गोळी छातीमध्ये लागल्यामुळे जागेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात आता पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (uttar pradesh news bjp leader jageshwar verma shot dead in amethi )

संबंधित बातम्या – 

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्यांची ठाकरे सरकारनं शिफारस केली नाही; पण मोदींनी दिलं ती मराठी पद्म मंडळी कोण?

राज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत

(uttar pradesh news bjp leader jageshwar verma shot dead in amethi )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें