AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पद्म पुरस्कारांच्या घोषणेवरुन केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. Sachin Sawant Padma Awards

राज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 26, 2021 | 1:18 PM
Share

मुंबई: काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पद्म पुरस्कारांच्या घोषणेवरुन केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने जवळपास 92 नावांच्या शिफारशी केल्या होत्या त्यापैकी एकच शिफारस स्वीकारली जाणं हे दुर्दैवी असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार दिल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला. राज्य सरकारनं शिफारस केलेल्या 92 नावांपैकी केवळ सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे, जसवंतीबेन पोपट आणि सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून गौरवण्यात आलं आहे. सिंधुताई सपकाळ वगळता राज्यानं इतरांची शिफारस केलेली नसतानाही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. (Sachin Sawant slams Central Government and BJP over Padma Awards )

भाजपशी जवळीक असणाऱ्यांना पुरस्कार

सचिन सावंत यांनी यावेळी बोलताना भाजपशी जवळीक असणाऱ्या केंद्र सरकारनं पुरस्कार दिल्याचा आरोप केला. युनायटेड फॉस्फरस लिमिटेडच्या सीईओ रजनीकांत श्रॉफ यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय. या कंपनीवर 2019 साली निवडणूक आयोगाने छापा टाकली होता. तिथे भाजपच्या प्रचाराचे साहित्य आढळले होते, असा आरोप सचिन सावंतांनी केला. याच कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर पियुष गोयल यांचे बंधू आहेत, असही सचिन सावंत म्हणाले. विदर्भात याच कंपनीच्या किटकनाशकांच्या फवारणीत ४० शेतकर्‍यांचा बळी गेला होता, अशी माहिती सावंत यांनी दिली.

युनायटेड फॉस्फरस लिमिटेडच्या सीईओ रजनीकांत श्रॉफ यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचवलं होते, असा आरोप देखील सचिन सावंतांनी केला. श्रॉफ यांच्यासारख्या लोकांची नाव पुरस्काराच्या यादीमध्ये येतात यावरुन भाजपशी जवळीक हा निकष पद्म पुरस्कारांना लावला गेला, यात शंका नाही, असंही सचिन सावंत म्हणाले.

ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे विविध मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचंही नाव होतं. ‘सीरम’चे अदर पूनावाला, दिग्गज अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांचीही नावं पाठवली होती. केंद्र सरकारनं राज्यानं पाठवलेल्या केवळ एका नावाचा विचार पुरस्कारासाठी केला आहे. विशेष म्हणजे, सिंधुताई सपकाळ यांचा पद्मभूषणने सन्मान करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. मात्र त्यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे.

संबंधित बातम्या:

ज्यांची ठाकरे सरकारनं शिफारस केली नाही; पण मोदींनी दिलं ती मराठी पद्म मंडळी कोण?

हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा : सिंधुताई सपकाळ

(Sachin Sawant slams Central Government and BJP over Padma Awards )

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ