AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरदिवसा घरात घुसून सीएची हत्या; पालघरमध्ये खळबळ

राहत्या घरीच दरोडेखोरांनी हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

भरदिवसा घरात घुसून सीएची हत्या; पालघरमध्ये खळबळ
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 6:58 PM
Share

पालघर : पालघरमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डहाणू मल्याण इथल्या एका व्यवसायाने सीए असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली आहे. राहत्या घरीच दरोडेखोरांनी हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (brutal murder of CA in palghar police investigating)

मिळालेल्या माहितीनुसार, जयप्रकाश पोंदा असं हत्या झालेल्या सीएचं नाव आहे. राहत्या घरी दरोडेखोरांनी त्यांची हत्या केली. शुक्रवारी, 15 जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार समोर आला. डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला शहरातील मुख्य रस्त्यावर जुन्या देना बँकेच्यासमोर त्यांचे घर असून तिथे ते एकटेच राहत होते. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी डाव साधला.

दरोडेखोरांनी त्यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करून, ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज डहाणू पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोंदा यांच्या घरी काम करण्यासाठी चार मोलकरनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेल्या. तेव्हा हा प्रकार समोर आला. त्यांनी ही माहिती जवळच असलेल्या रिक्षा स्टँडवर डहाणू रिक्षा चालक मालक युनियन संघटनेचे अध्यक्ष जयदेव पांडुरंग मर्द यांना दिली.

यानंतर मर्द यांनी डहाणू पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीएसआय कांबळी यांसह पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हत्या नेमकी कोणी केली याचा पोलीस शोध घेत असून परिसरात चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी घटनास्थळावरून पोंदा यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. (brutal murder of CA in palghar police investigating)

संबंधित बातम्या – 

एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही : वकील त्रिपाठी

प्रेमविवाहासाठी घरातून पोबारा, पालघरमध्ये प्रियकराने प्रेयसीला भिंतीत गाडलं

(brutal murder of CA in palghar police investigating)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.