प्रेमविवाहासाठी घरातून पोबारा, पालघरमध्ये प्रियकराने प्रेयसीला भिंतीत गाडलं

प्रेमविवाहासाठी घरातून पोबारा, पालघरमध्ये प्रियकराने प्रेयसीला भिंतीत गाडलं

प्रेयसीने लग्नाचा तगादाला लावल्यामुळे तिची हत्या करुन मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना पालघरमधील वाणगाव येथे घडली आहे. (Palghar boyfriend killed girlfriend)

prajwal dhage

|

Jan 15, 2021 | 2:20 PM

पालघर : प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिची हत्या करुन मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना पालघरमधील वाणगाव येथे घडली. 4 महिन्यांपूवी मृत मुलगी आणि आरोपी दोघे घरातून पळून गेले होते. मात्र, या काळात प्रियकराने तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह वाणगावमध्ये एका फ्लॅटच्या भिंतीत पुरल्याचे समोर आले आहे. प्रियकराने ही हत्या केल्याचे कबूल केले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी 4 महिन्यांपूर्वी आपल्या प्रियकरासोबत घरातून निघून गेली. ती आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यासाठी घरातून निघून गेली होती. मात्र, 4 महिने झाल्यानंतरसुद्धा मुलगी परत न आल्यामुळे तिच्या घरच्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. शेवटी मुलीचा शोध न लागल्यामुळे तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली.

चार महिन्यांपासून मुलगी जिवंत असल्याचे भासवले

मुलगी चार महिन्यांपासून गायब असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तिची शोध घेणे सुरु केले होते. पण मुलीचा शोध लागत नव्हता. या 4 महिन्यांमध्ये आरोपी प्रियकराने मुलीचे सोशल मीडिया अकाउंट वापरुन तसेच व्हॅट्सअ‌ॅपद्वारे मृत तरुणी जिवंत असल्याचे भासवले. आरोपी मुलीच्या व्हॅट्सअ‌ॅपवरुन मृत तरुणी बोलत असल्याचे भासवत तिच्या कुटुंबीयांशी बोलायचा. मात्र, शंका आल्यानंतर खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

तरुणीचा मृतदेह भिंतीत पुरला

आरोपी प्रियकर आणि मृत तरुणी घरातून निघूल गेल्यानंतर ते वाणगाव येतील वृंदावन या सदनिकेतील एका फ्लॅटमध्ये राहत होते. यावेळी मृत महिलेने आरोपीकडे लग्न करण्याचा तगादा लावला. याच रागातून तिच्या प्रियकराने तरुणीची हत्या केली. धक्कादाय बाब म्हणजे या आरोपीने तरुणीचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत ठेऊन त्या मृतदेहावर स्वतः बांधकाम केलं. तरुणीचा मृतदेह भिंतीत पुरला.शिवाय तो याच फ्लॅटमध्ये मागील चार महिन्यांपासून राहत होता.

दरम्यान,पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तरुणीचा मृतदेह भिंतीत पुरल्याचे आरोपीने सांगितले. त्यांनतर पोलिसांनी तरुणीचा कुजलेला मृतदेह भितीतून बाहेर काढला.  या खुनाची प्रियकराने कबुली दिली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

संबंधित बातम्या :

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क मोबाईलची चोरी, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

तिने माझ्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला; मनसेच्या मनीष धुरींची रेणू शर्मांविरोधात पोलिसांत तक्रार

मित्रासोबत लॉजवर गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें