भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा कट, हनी ट्रॅपने आरोपीला छोटा काश्मिरात बोलावलं, पण…

रिक्षावाल्या भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहीण यास्मिनने त्याच्या मारेकऱ्याला हनी ट्रॅप रचून मुंबईत बोलावलं (Lady plans murder to take revenge of Brothers killer)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:44 AM, 12 Jan 2021

मुंबई : भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीने मेगाप्लॅन आखला. इन्स्टाग्रामवर हनी ट्रॅप रचून तिने ‘भावाच्या मारेकऱ्या’ला मुंबईत बोलावलं. मात्र पादचाऱ्याची सतर्कता आणि मुंबई पोलिसांनी वेगवान पावलं उचलल्यामुळे तिच्या तावडीत सापडलेल्या ‘मारेकरी तरुणा’चा जीव वाचला. या प्रकरणी आरोपी बहिणीसह तिच्या पाच साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याच, पण हत्येच्या आरोपाखाली फरार असलेल्या त्या तरुणालाही अटक झाली. (Lady plans murder plot for revenge of Brothers killer)

रिक्षावाल्याच्या हत्या प्रकरणाने सुरुवात

मुंबईतील मालवणी भागात 9 जून 2020 रोजी झालेल्या हत्याकांडाची पार्श्वभूमी या प्लॅनला होती. एमएम कंपनी आणि साजिद-313 या रिक्षावाल्यांच्या दोन स्थानिक गटांमध्ये रिक्षा पार्किंगवरुन वाद झाला. वादाचं पर्यवसन तुफान हाणामारीत झालं. एमएम कंपनीच्या मोहम्मद सादिक उर्फ मेंटलने साजिद-313 ग्रुपच्या 24 वर्षीय अल्ताफ शेखची हत्या केली आणि मुंबईतून पळ काढला.

बहिणीच्या मनात सूडाची आग

अल्ताफच्या हत्येने त्याचं संपूर्ण कुटुंब हादरलं. मात्र त्याची बहीण यास्मिनने भावाच्या हत्येचा सूड घेण्याचा निर्धार केला होता. भावाचा मारेकरी सादिक दिल्लीत लपल्याची माहिती यास्मिनला मिळाली. त्यानंतर, मुंबईतील मालवणीत राहणारे भावाचे मित्र फारुख शेख (20), ओवेश नबिउल्लाह शेख (18), मोहम्मद मानिस सय्यद (20), कांदिवलीतील गणेश नगरमध्ये राहणारे निहाल झाकिर खान (32) आणि सत्यम कुमार पांडे (23) यांच्याशी तिने संपर्क साधला. अखेर सगळ्यांनी मिळून सादिकच्या हत्येचा कट आखला.

इन्स्टाग्रामवर हनी ट्रॅप

सादिक यास्मिनला ओळखत होता, त्यामुळे तिने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊण्ट ओपन केलं. सादिकशी ओळख वाढवून आधी तिने त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर यास्मिनने सादिकला मुंबईला बोलावलं. 9 जानेवारीला यास्मिनने त्याला छोटा काश्मीर गार्डनजवळ भेटायला बोलावलं. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सादिक पोहोचला. तेव्हा यास्मिन आणि पाच साथीदारांनी चाकूच्या धाकाने त्याला अॅम्ब्युलन्समध्ये बसवलं. (Lady plans murder plot for revenge of Brothers killer)

पादचाऱ्याची सतर्कता

हा प्रकार लांबून पाहणाऱ्या एका व्यक्तीला संशयास्पद वाटला. त्याने 100 नंबर डायल करुन पोलिसांना याची माहिती दिली. झोनल डीसीपी डॉ. स्वामी यांनी नाकाबंदी केली. साध्या वेशातील पोलिसांनी दहिसर चेकनाका आणि वेगवेगळ्या भागात तपास सुरु केला. अखेर संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास दहिसर चेकनाक्याच्या आधी आरोपींना पोलिसांनी पकडलं.

अॅम्ब्युलन्सने दगा दिला

सादिकच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना सापडलं होतं. मालवणी पोलिसांच्या साथीने यास्मिनचा मोबाईल नंबरही मिळाला. नंबर ट्रेस करुन पोलिसांनी अॅम्ब्युलन्सचा पाठलाग केला. कांदिवलीतील एसव्ही रोडवर शताब्दी रुग्णालयाजवळ अॅम्ब्युलन्सचं डिझेल संपलं. त्यामुळे आरोपींना इनोव्हा कार मागवावी लागली आणि याच वेळात पोलिसांनी त्यांना धरलं. सादिकला नायगावच्या जंगलात नेऊन ठार मारण्याचा यास्मिनचा प्लॅन होता. मात्र त्याआधीच ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली.

संबंधित बातम्या :

गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले बलात्कार

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

(Lady plans murder plot for revenge of Brothers killer)