गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क मोबाईलची चोरी, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी भोसरी उड्डाण पुलाखाली सापळा रचत आरोपींना अटक केली. (Pimpri Chinchwad Two Mobile Theft Arrested)

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क मोबाईलची चोरी, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

पिंपरी चिंचवड : प्रेयसीला वेगवेगळे मोबाईल देऊन इम्प्रेस करण्यासाठी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर साळवे आणि निलेश भालेराव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून 26 मोबाईल आणि 3 दुचाकी असा 4 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Two Mobile Theft Arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भोसरी उड्डाणपुलाखाली मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दोन अज्ञात व्यक्ती पायी चालत जाणाऱ्या अनेक पादचारी व्यक्तींचे मोबाईल हिसकावत असल्याची माहिती दरोडा विरोधी पथक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भोसरी उड्डाण पुलाखाली सापळा रचत आरोपींना अटक केली.

यावेळी दोन्ही आरोपींकडे केलेल्या चौकशीत भलतंच प्रकरण समोर आलं. हे दोघेही प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी मोबाईल चोरी करायचे. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. हे दोन्ही आरोपी चोरलेले मोबाईल दर दिवसाआड प्रेयसीला देत असतं.

विशेष म्हणजे मोबाईल वापरुन झाल्यानंतर तो परत घ्यायचा आणि दुसरा द्यायचा असे त्यांचा क्रम सुरु होता. हे करुन ते दोघेही प्रेयसीच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान या दोघांना दरोडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहे. या दोघांकडून 26 मोबाईल आणि 3 दुचाकी असा 4 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pimpri Chinchwad Two Mobile Theft Arrested)

संबंधित बातम्या : 

मित्रासोबत लॉजवर गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

लग्न मोडल्याचा मनात राग, भल्या पहाटे आईसह मुलीचं अपहरण; पुढे काय?

Published On - 12:01 am, Fri, 15 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI