AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रासोबत लॉजवर गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

नाशिकच्या सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमधली ही घटना आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मित्रासोबत लॉजवर गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ
| Edited By: | Updated on: Jan 13, 2021 | 6:31 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये गुन्ह्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिमध्ये एका हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकच्या सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमधली ही घटना आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Suspicious death of a young woman who went to lodge with a friend Nashik news)

अधिक माहितीनुसार, मृत तरुणी ही काल आपल्या मित्रासोबत लॉजवर आली होती. त्यानंतर आज सकाळी तरुणीचा खोलीमध्ये मृतदेह आढळून आला आहे. आता ही हत्या आहे की आत्महत्या आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीस तपसा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकणातील मृत तरुणी ही नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून मुलीच्या मित्रालाही ताब्यात घेतलं आहे.

पोलीस सध्या तरुणाची चौकशी करत असून त्याच्याकडून नेमकं काय झालं याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस तरुणीच्या कुटुंबियांची आणि तिच्या मैत्रिणींचीही या प्रकरणात चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Suspicious death of a young woman who went to lodge with a friend Nashik news)

संबंधित बातम्या – 

ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स; राष्ट्रवादीवर संक्रात?

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताची आत्महत्या, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

(Suspicious death of a young woman who went to lodge with a friend Nashik news)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...