अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताची आत्महत्या, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताची आत्महत्या, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

कोल्हापूर : कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताने गळफास (Minor Girl Rape Suspect Suicide) घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे ही घटना घडली आहे. हिरवडे गावातिल आपल्या शेतातील शेड मध्ये खाडे याने गळफास घेतल्याचं मंगळवारी (12 जानेवारी) सायंकाळी उघडकीला आला (Minor Girl Rape Suspect Suicide).

नेताजी खाडे असे मृत संशयिताचे नाव आहे. रविवारी अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप या संषयितावर करण्यात आला होता. त्यानंतर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत नेताजी खाडे याने रविवारी (10 जानेवारी) दुपारी गावातील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून मध्यवस्तीतील एका ठिकाणी बोलावून घेतलं. या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. मुलीने आरडाओरडा करतातच खाडे याने तिथून पळ काढला होता.

मुलीच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत करवीर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नेताजी खाडे विरोधात तक्रार दिली होती. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचा कळताच नेताजी खाडे पसार झाला होता. त्याचा नातेवाईकांकडून आणि पोलिसांकडून शोध सुरु होता.

दरम्यान, शेतात खाडे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत मंगळवारी सायंकाळी आढळून आला. आत्महत्येआधी हाताला रुमाल बांधून गळफास घेतल्याचे स्पष्ट झालं. दरम्यान, नेताजी खाडे याने आत्महत्येपूर्वी चिठ्टी लिहिली होती. यामध्ये आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये असा उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांना या आत्महत्येबद्दल समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे सावर्डे गावात तणावपूर्ण शांतता असून खबरदारी म्हणून गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Minor Girl Rape Suspect Suicide

संबंधित बातम्या :

लग्न मोडल्याचा मनात राग, भल्या पहाटे आईसह मुलीचं अपहरण; पुढे काय?

नावाला धर्मप्रचारक पण करायचा मुलींचे लैंगिक शोषण, कोर्टाने दिली तब्बल 1000 वर्षांची शिक्षा

धक्कादायक! गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले बलात्कार

Published On - 9:04 am, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI