AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांचा मुलीनेच काटा काढला, बॉयफ्रेण्डच्या मित्रामार्फत खून

तृप्तीनगर परिसरात राहणाऱ्या रवीदत्त दुबे नावाच्या व्यक्तीची राहत्या घरात गोळी झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हत्येच्या वेळी त्यांची पत्नी, दोन्ही मुली आणि मुलगा हे सर्व घरातच होते.

प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांचा मुलीनेच काटा काढला, बॉयफ्रेण्डच्या मित्रामार्फत खून
बॉयफ्रेण्डच्या मित्राकडून तरुणीने वडिलांची हत्या करुन घेतली
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 16, 2021 | 12:12 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात धुमसत होता.

नेमकं काय घडलं?

ग्वाल्हेरमधील थाटीपूर भागात चार ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली होती. तृप्तीनगर परिसरात राहणाऱ्या रवीदत्त दुबे नावाच्या व्यक्तीची राहत्या घरात गोळी झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हत्येच्या वेळी त्यांची पत्नी, दोन्ही मुली आणि मुलगा हे सर्व घरातच होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांना जाग आली होती. रवीदत्त यांच्या पोटात गोळी लागल्याने रक्तस्राव होत असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

धाकट्या मुलीचे तरुणाशी प्रेमसंबंध

घरातील पहिल्या मजल्यावर घुसून एखाद्याची हत्या झाली, आणि तोपर्यंत घरात कोणालाच समजलं नाही, यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी घरातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा धाकट्या मुलीचे पुष्पेंद्र नावाच्या तरुणाची गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक कॉल झाल्याचं समोर आलं. धाकट्या मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असून रवीदत्त दुबे यांनी त्याला मारहाण केली होती, असं पोलीस तपासात उघड झालं.

बॉयफ्रेण्डच्या मित्राकडून खून 

पुष्पेंद्र हा धाकट्या मुलीच्या बॉयफ्रेण्डचा मित्र होता. पैसे देऊन तिने पुष्पेंद्रला वडिलांची हत्या करण्यास तयार केलं होतं. घटनेच्या रात्री सर्व जण झोपी गेल्यावर तिने पुष्पेंद्रला रवीदत्त यांच्या खोलीत नेलं. तिथे त्यांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर तो पसार झाला. जवळपास आठवडाभर या प्रकरणावर पडदा होता, मात्र चौकशीत तिने आपल्या कृत्याची कबुली दिली.

संबंधित बातम्या :

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा