मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

22 वर्षीय कर्मपाल उर्फ राहुल अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याची आई आणि भावानेच हत्या करुन मृतदेह घरात पुरला आहे, अशी तक्रार राहुलच्या आत्या आणि तिच्या नवऱ्याने पोलिसात दिली होती

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा
रोहतकमध्ये मुलाच्या हत्येप्रकरणी आईला अटक

गुरुग्राम : धाकट्या मुलाच्या मदतीने सख्ख्या आईनेच आपल्या मोठ्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचा मृतदेह आरोपी मायलेकांनी घरातच पुरला होता. मात्र घरातील एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून आत्या आणि तिच्या नवऱ्याला संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हरियाणातील रोहतकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला.

22 वर्षीय कर्मपाल उर्फ राहुल अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याची आई आणि भावानेच हत्या करुन मृतदेह घरात पुरला आहे, अशी तक्रार राहुलच्या आत्या आणि तिच्या नवऱ्याने पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. त्यांच्या घरातून राहुलचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

राहुल दर आठ-पंधरा दिवसांनी आपल्या आत्याच्या घरी भेटायला यायचा. मात्र दोन महिने उलटून गेले, तरी तो न आल्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आत्या आणि तिचे यजमान रोहतकजवळील सैमाण गावात त्याला भेटायला आले. तिथे एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून त्यांच्या संशयाचं खात्रीत रुपांतर झालं. त्यांनी तडक पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी फरिदाबादमधून आई, तर रोहतकमधून मुलाला अटक केली. सैमाण गावातील घराची जमीन उकरुन त्यातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.

चंद्रपुरात मोठ्या भावाने धाकट्याला पुरलं

दुसरीकडे, टीव्हीवरील गुन्हे विषयक मालिका आणि फिल्मी पद्धतीने गुन्हे करण्याच्या योजना पाहून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गेल्या वर्षी घडली होती. खून केल्यानंतर या निर्दयी मोठ्या भावाने लहान भावाचा मृतदेह फिल्मी स्टाईलने पुरला. चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात हा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता

संबंधित बातम्या :

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

Chandrapur Crime | टीव्हीवर पाहून लहान भावाची हत्या, मृतदेह पुरला, पावसामुळे हत्येचं गुपित उलगडलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI