AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Online Gambling : ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट, कर्नाटकात बंदी आणणार, महाराष्ट्रही बंदीच्या विचारात

Online Gambling : तरुणांच्या स्मार्टफोनवर सध्या ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अनेक तरुण या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडत आहेत. विद्यार्थी, नोकरदार आणि काही व्यावसायिकही ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले आहेत.

Online Gambling : ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट, कर्नाटकात बंदी आणणार, महाराष्ट्रही बंदीच्या विचारात
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 13, 2021 | 8:38 AM
Share

नागपूर : तरुणांच्या स्मार्टफोनवर सध्या ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अनेक तरुण या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडत आहेत. विद्यार्थी, नोकरदार आणि काही व्यावसायिकही ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले आहेत. नागपुरातील सायबर पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आहे. काही तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत आल्या आहेत. पण कायद्यानं बंदी नसल्याने हा ऑनलाईन जुगार सर्रास सुरु आहे, यात दिवसेंदिवस तरुण पिढी अडकत चालली आहे.

यातूनच तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. या ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

पैसे गमावल्याने नैराश्य

“अनेक तरुण ऑनलाईन जुगाराच्या आहारीत गेले आहेत. पैसै हरल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्यही येत आहे, काही जण तर आत्महत्येपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनीही केली आहे.

कर्नाटक सरकार विधेयक आणणार

कर्नाटक सरकार आजपासून (13 सप्टेंबरपासून) सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारा कायदा आणत आहेत, त्यामुळे कर्नाटक सरकार करु शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा प्रश्नही त्यानिमित्तानं उपस्थित होतोय.

दरम्यान, या कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. बंदी असूनही कर्नाटकात कोणी ऑनलाईन जुगार खेळताना, त्याला प्रोत्साहन देताना सापडल्यास कडक कारवाई होऊ शकते.

ऑनलाईन जुगार बंदी घालणारं तेलंगणा पहिलं राज्य

देशात ऑनलाईन जुगारावर बंदी नाही. मात्र 2017 मध्ये कायद्याने ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरले होते. आतापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांनी केवळ गेल्या एका वर्षात ऑनलाईन जुगारावर बंदी आणण्यासाठी कायदे आणि सुधारणा आणल्या.

कर्नाटकातील प्रस्तावित बंदीला रमी आणि पोकर पोर्टलद्वारे कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्याची अपेक्षा आहे ज्याने अलीकडेच मशरूम केले आहे.

नागपुरात गुन्हेगारी वाढली

नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांमध्ये दोन हत्येच्याघटना घडल्यामुळे एकच खळबळ उडालीय. काल रात्री नागपुरात वर्चस्वाच्या वादातून तिघांनी एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी जवळ असलेल्या गणेश भोजनालय समोर हे हत्याकांड घडलं.

आवेश खान पठाण असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तीनही मारेकरी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी मारेकऱ्यांबाबत माहिती काढली असून पोलिसांची दोन पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवार रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली.

संबंधित बातम्या  

#क्राईम_किस्से : Rinku Patil | दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, अंगावर काटा आणणारे 32 वर्ष जुने रिंकू पाटील हत्याकांड

मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, बलात्काराचे 550 गुन्हे, किती आरोपींना अटक?

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश