शेतीसाठी नुकतीच विहिर खोदली, अचानक विहिरीच्या पाण्यात प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला मृतदेह, शेतकरी जागेवरच स्तब्ध

आपल्या आयुष्यात कधी कोणता क्षण कसा येईल, याची काहीच कल्पना करता येणार नाही. कारण कधीही काहीही घडू शकतं (Dead Body found in well in Sangli).

शेतीसाठी नुकतीच विहिर खोदली, अचानक विहिरीच्या पाण्यात प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला मृतदेह, शेतकरी जागेवरच स्तब्ध
शेतीसाठी नुकतीच विहिर खोदली, अचानक विहिरीच्या पाण्यात प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला मृतदेह, शेतकरी जागेवरच स्तब्ध
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 10:26 PM

सांगली : आपल्या आयुष्यात कधी कोणता क्षण कसा येईल, याची काहीच कल्पना करता येणार नाही. कारण कधीही काहीही घडू शकतं. पण यामुळे आपण आयुष्यात सकारात्मक राहणं सोडू नये. अर्थात जगण्यासाठी हाच एक महत्त्वाचा आणि रामबाण उपाय आहे. हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे सांगलीत एका शेतकऱ्यासोबत घडलेली अनपेक्षित अशी घटना. या शेतकऱ्याने स्वत:च्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी, चांगल्या भावनेने शेतात विहिर खोदली. पण या विहिरीला कुणाची तरी नजर लागावी असंच काहीसं घडलं. कारण विहिर तयार झाल्यानंतर नुकतंच काही दिवसात एक विचित्र घटना घडली आहे (Dead Body found in well in Sangli).

नेमकं काय घडलं?

सांगलीच्या तासगाव-निमणी रस्त्यालगत चेतना पेट्रोल पंपाजवळ सुभाष लुगडे यांची शेतजमीन आहे. सुभाष यांनी आपल्या शेतात नुकतीच नवी विहीर बनवली होती. पण या विहीरीत त्यांनी गुरुवारी (10 जून) संध्याकाळी प्लास्टिक आणि कागदात गुंडाळलेला मृतदेह तरंगताना बघितला. त्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते आतून खचले. पण त्यांनी डगमगून न जाता तातडीने याबाबतची माहिती तासगाव पोलिसांना दिली (Dead Body found in well in Sangli).

स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर

या घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी परिसरात उसळली. आजूबाजूच्या गावांपर्यंत संबंधित घटनेची माहिती पोहोचली आणि खळबळ उडाली. विहिरीत नेमका कुणाचा मृतदेह असेल? असा अंदाज अनेक लोक बांधू लागले. या घटनेमुळे घटनास्थळी दाखल झालेल्यांपैकी मृतदेह बघितल्यानंतर काही जणांचा थरकाप उडाला. विशेष म्हणजे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, या घटनेबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. मृतदेह पाहिल्यानंतर खून करून हा मृतदेह विहिरीत टाकला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अद्याप मृतदेह कोणाचा याबाबत ओळख पटलेली नाही. याबाबत अधिक तपास तासगाव पोलिसांकडून सुरु आहे.

संबंधित बातमी : अंगणात खेळणारे बहीण-भाऊ अचानक गायब, बऱ्याच शोधाशोधीनंतर संध्याकाळी सापडले, पण..

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.