AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी खांबाला बांधलं, मग लाठ्या-काठ्यांनी इतकं मारलं की जीवच गेला, त्या तरूणाचा काय गुन्हा होता ?

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्या तरूणाला बेदम मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तो तरूण व्हिवळत होता, सोडून देण्याची विनंती करत होता, मात्र त्याचे कोणीच ऐकले नाही.

आधी खांबाला बांधलं, मग लाठ्या-काठ्यांनी इतकं मारलं की जीवच गेला,  त्या तरूणाचा काय गुन्हा होता ?
| Updated on: Sep 27, 2023 | 3:31 PM
Share

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाला खांबाा बांधून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार राजधानीतील नंदनगरी भागात घडला. गैरसमजातून काही युवकांनी त्याला खांबाला बांधले आणि शिवीगाळ करत बेदम चोप (youth beaten up) दिला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. त्या युवकाच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. युवकाला खांबाला बांधून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून पोलिस मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.

साधासुधा तरूण का अडकला ? तिथे नेमकं काय घडलं ?

नंदनगरी येथे भाजी विकणारे अब्दुल यांनी पोलिसांना सांगितले की, मंगळवारी त्यांचा २६ वर्षीय मुलगा इसार हा पहाटे पाचच्या सुमारास घरातून सुंदरनगरीच्या दिशेने निघाला होता. तो जी-4 ब्लॉकजवळ पोहोचला तेव्हा काही मुलांनी त्याचा रस्ता अडवत चौकशी सुरू केली. ते त्याला चोर समजले आणि त्यांनी लगेचच त्याला खांबाला घट्ट बांधून लाठ्या-काठ्यांनी बेदम चोप द्यायला सुरूवात केली. संध्याकाळी जेव्हा त्याचे वडील घरी पोहोचले तेव्हा त्यांना त्यांचा तरूण मुलगा घरासमोर , रक्तबंबाळ झालेला जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा झाल्या होत्या.

लाठ्या -काठ्यांनी केली पिटाई

इसारने त्याच्या वडिलांना सांगितले की, त्याला सुंदर नगरीजवळ जी-4 ब्लॉक येथे काही मुलांनी थांबवले. आणि खांबाला बांधून मारले. ते त्याला चोर समजत होते. या मारहाणीनंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. इसारने काही मुलांची ओळख पटवत, त्यांची नावं वडिलांना सांगितली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आमिरने त्याला रिक्षात बसवून घरी आणल्याचेही त्याने नमूद केले. मात्र यानंतर अवघ्या तासभरातच इसरचा दुर्दैवी मृत्यू झाला. पित्यासमोरच त्याने अखेरचा श्वास घेतला.

या घटनेबद्दल नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल

त्या तरूणाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो तरूण खांबाला बांधलेल्या अवस्थेत दिसत असून काही तरूण त्याच्यावर काठ्यांचा प्रहार करत आहेत. पीडित युवक वारंवार त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, सोडून देण्याची विनंती करत होता. मात्र त्या तरूणांनी त्याचे काहीही न ऐकता त्याला निर्घृणपणे चोप दिला.

Follow Us
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं