CCTV VIDEO | दिल्लीतील भरचौकात तरुणावर चाकूहल्ला, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

दिल्लीच्या संगम विहार परिसरात एल ब्लॉकमधील रस्त्यावर संध्याकाळी एका तरुणाने दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला केला. खुनाची ही भीषण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

CCTV VIDEO | दिल्लीतील भरचौकात तरुणावर चाकूहल्ला, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
दिल्लीतील हत्याकांड सीसीटीव्हीत कैद


नवी दिल्ली : भरचौकात चाकूने भोसकून तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना राजधानी दिल्लीत उघडकीस आली आहे. दक्षिण दिल्लीच्या संगम विहार परिसरात एल ब्लॉकमधील रस्त्यावर संध्याकाळी एका तरुणाने दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला केला. खुनाची ही भीषण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

मयत तरुण हा संगम विहारचा रहिवासी इम्रान आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसते की आरोपी तरुण हा इम्रानशी वाद घालत होता. नंतर तो पुन्हा इम्रानकडे येतो आणि त्याच्यावर चाकूने हल्ला करतो. त्याच्यासोबत उपस्थित तरुण हे आरोपीला रोखण्याचा प्रयत्न करतात, परंतु आरोपी इम्रानवर चाकूने अनेक वेळा हल्ला करतो. त्यानंतर कुठलीही चाड न बाळगता तो आरामात रस्त्यावरुन चालत निघून जातो.

नेमकं काय घडलं?

इम्रानच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांना माहित नाही की इम्रानची हत्या कोणी आणि का केली. इम्रान आणि आरोपी यांच्यात इम्रानच्या घराजवळील रस्त्यावर भांडण कशामुळे झाले, ज्यामुळे आरोपींनी अचानक इम्रानवर चाकूने वार करून त्याची हत्या केली, याचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपी आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत, जे हत्येनंतर पळून गेले.

पाहा व्हिडीओ :

पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या

दुसरीकडे, लष्कराच्या मिलिट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील (गुप्तवार्ता संकलन प्रशिक्षण संस्था) लेफ्टनंट कर्नल पदावरील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पुणे शहरातील वानवडी परिसरात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधील आर्मी ट्रेनिंग कमांड येथील लष्कराच्या ब्रिगेडियरवर (सुपिरियर आर्मी ऑफिसर) गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

रश्मी आशुतोष मिश्रा (वय 43 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अधिकाऱ्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. अजित मिलू असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

पुण्यातील वानवडी भागात मिलिट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो (MINTSD) ही प्रशिक्षण संस्था आहे. इथे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पॅरा मिलिटरी फोर्स, नागरी गुप्तचर संस्था यामधील गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी महिला अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात होता.

संबंधित बातम्या :

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, नाशकात पाच जण अटकेत

पुण्यात 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिला मृतावस्थेत आढळली, आत्महत्येचा संशय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI