KKR vs PBKS : टी 20 मधील सर्वात मोठा विजय, पंजाबकडून 262 धावांचा यशस्वी पाठलाग, केकेआरचा 8 विकेट्सने धुव्वा

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Punjab Kings Highlights In Marathi : पंजाब किंग्सने इतिहास रचला आहे. पंजाबने टी 20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

KKR vs PBKS : टी 20 मधील सर्वात मोठा विजय, पंजाबकडून 262 धावांचा यशस्वी पाठलाग, केकेआरचा 8 विकेट्सने धुव्वा
Jonny Bairstow and Shashank Singh,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 11:41 PM

पंजाब किंग्सने इतिहास रचला आहे. पंजाब किंग्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने टी 20 मधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन धमाकेदार विजय मिळवला आहे. केकेआरने पंजाबसमोर विजयासाठी 262 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 2 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पंजाबकडून जॉनी बेयरस्टो सर्वाधिक धावा केल्या. बेयरस्टोने शतक ठोकलं. तर शशांक सिंहने वादळी अर्धशतक ठोकून पंजाबला झटपट विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

पंजाबची बॅटिंग

प्रभसिमरन सिंह (इमपॅक्ट) आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने झंझावाती सुरुवात केली. या दोघांनी पावर प्लेमधील 5.5 ओव्हरमध्ये 90 धावांनी तुफानी भागीदारी केली. त्यानंतर सहाव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर प्रभसिमरन सिंह रन आऊट झाला. प्रभसिमरनने 20 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली. प्रभनंतर रायली रुसो मैदानात आला. रायली आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रायली 26 धावांवर बाद झाला. रायलीनंतर शशांक सिंह मैदानात आला. शशांक आणि बेयरस्टो या जोडीने पंजबला विजयापर्यंत पोहचवलं. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची झंझावाती भागीदारी केली. बेयरस्टो आणि शशांक या दोघांनी या दरम्यान धुव्वाधार फटकेबाजी केली.

जॉनीने 48 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 8 चौकारांच्या मदतीने 108 धावांची नाबाद शतकी खेळी केली. बेयरस्टोचं हे आयपीएलमधील दुसरं शतक ठरलं. तर शशांक सिंहने 28 बॉलमध्ये 8 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. तर केकेआरडून सुनील नरेनने एकमेव विकेट घेतली.

केकेआरची बॅटिंग

दरम्यान त्याआधी पंजाबने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी बोलावलं. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 261 धावा केल्या. कोलकाताकडून फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेन या सलामी जोडीने सर्वाधिक धावा केल्या. फिलीप सॉल्ट याने 37 बॉलमध्ये 75 धावा ठोकल्या. सुनील नरेनने 32 बॉलमध्ये 71 रन्स केल्या. वेंकटेश अय्यर याने 23 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. आंद्रे रसेल याने 12 बॉलमध्ये 24 धावा जोडल्या. कॅप्टन श्रेयस अय्यर याने 28 रन्स केल्या. रिंकू सिंह याने 5 आणि रमनदीप सिंहने 6 धावा केल्या. तर पंजाबकडून अर्धशदीप सिंह याने सर्वात जास्त 2 विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहर या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय पंजाबच्या नावावर

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन: सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रायली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

Non Stop LIVE Update
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.