AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरातीत सगळे नाचत होते, जल्लोषात वडिलांकडून फायरिंग, मुलालाच लागली गोळी अन..

बिहारमधील सहरसा येथे लग्नाच्या वरातीत सगळे नाचत होते. आनंदाच्या भरात एका डॉक्टरने गोळीबार केला, मात्र ती गोळी त्यांच्या मुलालाच लागली आणि एकच कल्लोळ माजला. पुढे काय झालं ?

वरातीत सगळे नाचत होते, जल्लोषात वडिलांकडून फायरिंग, मुलालाच लागली गोळी अन..
लग्नाच्या वरातीत सगळे नाचत होते तेवढ्यात गोळीबार झाला आणि..Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 02, 2025 | 12:48 PM
Share

लग्नाची वरात, बँड बाजा, गाण्याच्या ठेक्यावर सगळे जल्लोषात नाचत असतात. पण बऱ्याचदा लग्नाच्या वरातीत काही जणांकडून गोळीबारही केला जातो, आणि होत्याचं नव्हतं होऊ शकतं. बिहारच्या सहरसामध्येही असंच काहीस घडलं. लग्नाच्या वरातीत, जल्लोषात नाचताना अचानक गोळीबार झाला आणि एका क्षणात गदारोल माजला. नेमकं काय झालं ?

बिहारमधील सहरसा येथेही आनंदोत्सवानिमित्त गोळीबार झाल्याची घटना घडली. तेथे लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान, एका डॉक्टरने आनंदोत्सवात गोळीबार केला. मात्र डॉक्टरांनी झाडलेली गोळी त्यांच्याच मुलाला गोळी लागली. यानंतर, उत्सवाच्या वातावरणात गोंधळ उडाला.

ही संपूर्ण घटना बुधवारी रात्री शहरातील गंगजळा चौकातील एका खाजगी रिसॉर्टमध्ये घडली. गोळीने जखमी झालेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी त्याला दाखल केले नाही. त्यांनी त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल न करताच ते त्याला घेऊन गेले. लग्नाला आलेल्या लोकांनी सांगितले की हे औषध व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे लग्न होते. लग्नाची मिरवणूक सुपौलहून आली होती. लग्नाला अनेक डॉक्टर आले होते.

पोलिसांना कळवलंदेखील नाही

लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या एका डॉक्टरने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी, जल्लोषात गोळीबार केला असं उपस्थित लोकांपैकी काहींनी सांगितलं. मात्र चुकून ती गोळी डॉक्टरच्या मुलाला लागली. लग्नासाठी वर आणि वधूच्या, दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते. गोळीबाराच्या घटनेनंतर लग्न समारंभात गोंधळ उडाला. लग्नाच्या मिरवणुकीत जल्लोषादरम्यान गोळीबार झाल्याचे रिसॉर्ट संचालकानेही मान्य केलं. मात्र, धक्कादायक गोष्ट म्हणजेकोणीही पोलिसांना याबद्दल माहिती दिलीच नाही.

गोळीबाराची चौकशी सुरू

दरम्यान पोलिस या प्रकरणाची माहिती गोळा करत आहेत, असे सदर पोलिस ठाण्याचे प्रभारी सुबोध कुमार म्हणाले. रिसॉर्ट मालकाने किंवा जखमी तरुणाने उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबाराबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. बिहारमधील लग्न समारंभात होणाऱ्या गोळीबाराबद्दल पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. शस्त्रे जप्त केली जात आहेत आणि परवानेही रद्द केले जात आहेत. पण त्यानंतरही लग्नाच्या मिरवणुकीत अशा घटना घडणं थांबत नाहीत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...