गडद अंधारात हल्ला, हात-पाय बांधून मारहाण, नंदुरबारमध्ये 20 लाखांचा दरोडा

या दरोड्यामध्ये कपड्यांच्या 128 गठाणांसह सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला. दरोडेखोरांनी आयसर गाडीला थांबवून चालकाचे हातपाय बांधत ही लूट केलीय. यामध्ये दरोडेखोरांनी आयसर चालकासह इतर दोघांना मारहाण केलीआहे. नंदुरबार वाका चार रस्त्यावर ही घटना घडली.

गडद अंधारात हल्ला, हात-पाय बांधून मारहाण, नंदुरबारमध्ये 20 लाखांचा दरोडा
NANDURBAR POLICE

नंदुरबार : गुजरात राज्यातून व्यापार करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या वाहनचालकाला तसेच मालकाला मारहाण करत लुटमार करण्यात आली आहे. या दरोड्यामध्ये कपड्यांच्या 128 गठाणांसह सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला. दरोडेखोरांनी आयसर गाडीला थांबवून चालकाचे हातपाय बांधत ही लूट केलीय. यामध्ये दरोडेखोरांनी आयसर चालकासह इतर दोघांना मारहाण केलीआहे. नंदुरबार वाका चार रस्त्यावर ही घटना घडली. (driver and owner carrying clothes from Gujarat has been beaten and robbed in nandurbar)

अहमदाबादहून अमरावतीकडे येताना हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील म्हसवे येथील रहिवाशी किशोर संतोष पाटील हे आपले आयसर ट्रक घेऊन अहमदाबाद येथून कापडाचे गठाण भरुन अमरावतीकडे निघाले होते. यावेळी रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांच्यासमोर एक अज्ञात ट्रक येऊन उभा राहिला. त्यांतर ट्रकमधील एकाने आयसर चालक संजय मच्छिंद्र पाटील यांच्या हात तसेच खांद्यावर मारहाण केली. त्याचबरोबर गाडी मालक किशोर संतोष पाटील यांचेही हातपाय बांधून त्यांना मारहाण करण्यात आली.

वाहन चालकासह मालकालाही मारहाण

त्यानंतर चार दरोडेखोरांपैकी एकाने आयसर गाडी अज्ञात ठिकाणी नेली. गाडीला अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांनी जबरी लूट केली. यामध्ये जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला. नंदुरबार वाका चार रस्त्यावर वाहनचालकासह मालकालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर लूट करणारे चौघेही मुद्देमाल घेऊन पसार झाले.

पोलिसांकडून तपास सुरु

ही घटना घडल्यांतर संजय पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस दरोडेखोरांचा तपास गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यात करत आहे.

इतर बातम्या :

पोलिसांवर विश्वास नाही, स्वप्निलच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करा; आई-वडिलांची मागणी

दुसरं लग्न केलं, मुलगी झाली, पण पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं

रांजणगाव MIDCमध्ये गुन्हेगारी वाढली; खंडणी वसूल करणाऱ्या कामगार नेत्याला अटक, गुन्हेगारांना रोखण्याचं पोलिसांपुढे आव्हान

(driver and owner carrying clothes from Gujarat has been beaten and robbed in nandurbar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI