AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Theft : वसईत महागड्या सायकल चोरणारी टोळी जेरबंद; आरोपींकडून 25 सायकल जप्त

सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन, तांत्रिक बाबींचा आधार घेत पोलिसांनी तपास सुरु केला. तपासाअंती या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

Vasai Theft : वसईत महागड्या सायकल चोरणारी टोळी जेरबंद; आरोपींकडून 25 सायकल जप्त
वसईत महागड्या सायकल चोरणारी टोळी जेरबंदImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 29, 2022 | 7:45 PM
Share

वसई : वसई, विरार, नालासोपारा परिसरातून महागड्या सायकल चोरी (Cycle Theft) करणाऱ्या टोळीचा वसई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळीतील 4 आरोपींना बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. अंश माताप्रसाद जयस्वाल (36), मखंचू रामगोपाल कानोजिया (30), विजयकुमार घनश्याम गुप्ता (33), महेंद्र खिनीलाल सरोज (37) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण वसईच्या वालीव, भोयदापाडा परिसरातील असून मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत. आरोपींकडून 89 हजार 400 रुपये किमतीच्या 25 सायकल जप्त (Seized) केल्या आहेत. सध्या हे चारही आरोपी वसई पोलिसांच्या ताब्यात आहेत. प्रत्येक गुन्ह्यात आरोपींची पोलीस कोठडी घेऊन तपास सुरू असल्याची माहिती वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.

चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने पोलिस पथकाने तपास सुरु केला

आरोपींचे वसईतील वालीवमध्ये गॅरेज आहे. वसई पोलीस ठाणे हद्दीत महागड्या सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ यांच्या नेतृत्वाखाली एपीआय राम सुरवसे, सुनील पवार, पीएसआय विष्णू वाघमोडे, पोलीस हवालदार सुनील मवालकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, सूर्यकांत मुंढे, राजेंद्र जाधव, शरद पाटील, अक्षय नांदगावकर यांचे स्वतंत्र पथक बनवून तपासाला सुरवात केली होती.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबींचा तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन, तांत्रिक बाबींचा आधार घेत पोलिसांनी तपास सुरु केला. तपासाअंती या गुन्ह्यांची उकल झाली आहे. सोसायटी, मोकळे मैदान, बंगले यामध्ये लावलेल्या सायकलची यातील एक चोरटा रेखी करायचा, दुसरे दोघे जण सायकल चोरी करून गॅरेजमध्ये नेऊन ठेवायचे आणि चौथा त्या सायकल विक्री करायचा. 15 ते 20 हजाराची सायकल 5 ते 6 हजारात विकून पैसे मिळवायचे. या चोरट्याने वसई पोलीस ठाण्यातील 8 गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी वसई विरार नालासोपारा परिसरात कुठे कुठे चोरी केल्या आहेत, याचा आम्ही तपास करीत आहेत अशी माहिती वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली. (Expensive bicycle stealing gang arrested in Vasai, 25 bicycles seized from the accused)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा