दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!

| Updated on: Oct 25, 2021 | 3:50 PM

प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून वाचावी अशी ही बातमी. कारण ही तितकीच भयंकर, धडा देणारी आहे. अतिशय विचित्र आणि बाळाचा हकनाक बळी घेण्याऱ्या या प्रकरणाची माहिती काळजाला चरे पाडते.

दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः अति शहाणा त्याचा त्याचा बैल रिकामा, अशी म्हण आपल्याकडे आहे. अशाच एका दीडशहाण्याने बापाने आपल्या अवघ्या 14 महिन्यांच्या मुलीवर घरीच उपचार केले. त्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झाल्याची ह्रदद्रावक घटना नाशिकमध्ये घडली. याप्रकरणी बाळाच्या आईच्या तक्रारीवरून हेमंत शेटे (रा. मखमलाबादरोड, पंचवटी) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून वाचावी अशी ही बातमी. कारण ही तितकीच भयंकर, धडा देणारी आहे. अतिशय विचित्र आणि बाळाचा हकनाक बळी घेण्याऱ्या या प्रकरणाची माहिती काळजाला चरे पाडते. हे वाचून कोणीही म्हणेल, शिक्षण घेऊन उपयोग नसतो. तर समज आणि अक्कल असावी लागते. त्याचे झाले असे की, मखमलाबाद रोडवरील पंचवटीतल्या शेटे कुटुंबाच्या अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीवर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे हे बाळ उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते. त्याची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत होती. हे पाहून मुलीच्या बाबाने बाळाला घरी नेण्याची परवानगी मागितली. मात्र, हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी सध्या उपचार सुरू आहेत. घरी नेऊ नका असे सांगितले. शेवटी जर तुम्हाला घरी न्यायचे असेल, तर स्वतःच्या जबाबदारीवर न्या, असा इशाराही दिला. मात्र, असा धोक्याचा इशारा देऊनही ऐकल तो कसला शहाणा. त्यामुळे शेटे याने शेवटी आपलेच म्हणणे खरे केले. आम्ही आमच्या बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणार आहोत, अशी थाप मारली. त्यानंतर डिस्चार्ज मिळाला. बाळाला घरी आणण्यात आले. खरे तर बाळाला घरी आणण्यासाठी शेटेच्या पत्नी व आईंचा विरोध होता. मात्र, शेटेचा अति शहाणपणा त्यांच्यावरही भारी पडला.

म्हणे, मला सिव्हिलमध्ये कामाचा अनुभव…

आपल्या बाळावर घरी उपचार करायला शेटेच्या पत्नीने विरोध दर्शवला. तेव्हा शेटेने आपल्या कुटुंबाला सांगितले की, मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. मी एका फार्मा कंपनीत कामाला आहे. त्यामुळे काय उपचार करायचे, ते मला माहित आहे, असे म्हणत त्याने घरातील इतर मंडळींचे म्हणणे अक्षरशः उडवून लावले. त्याने आपली आई व पत्नी या दोघांनाही जुमानेले नाही आणि हट्ट करून बाळाला घरी आणलेच.

अन् बाळाचा करुण अंत…

बापाने वेड्या अट्टाहासापायी आपल्या अवघ्या चौदा महिन्यांच्या बाळावर घरातच उपचार सुरू केले. मात्र, शेटेला निदान करणे जमलेच नाही. आणि जी भीती होती, तेच झाले. अखेर या चुकीच्या उपचाराने त्या बाळाचा जीव गेला. यामुळे आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिने पतीला बोल लावला. भांडण केले. मात्र, काही केले तरी आता बाळ येणार नव्हते. शेवटी या आईने पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर शेटेला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

इतर बातम्याः

दिल गार्डन गार्डन हो गया…गमाडी गंमत, नाशिकमध्ये साकारली फुलपाखरांची बाग!

साहित्याची मैफल रंगणार आमने-सामने; नाशिकमध्ये ‘त्याच’ तारखांना विद्रोही संमेलन घेण्याची तयारी