AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : धाड धाड धाड…टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, हादरवून टाकणारा पहिला व्हिडीओ समोर!

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकारवर जुहूत गोळीबार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुहू्च्या पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ जात होता. त्यावेळी लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत असताना टायगर श्रॉफच्या कारवर मोटार सायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे.

Video : धाड धाड धाड...टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, हादरवून टाकणारा पहिला व्हिडीओ समोर!
| Updated on: Oct 18, 2026 | 8:34 PM
Share

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकारवर जुहूत गोळीबार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुहू्च्या पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ जात होता. त्यावेळी लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत असताना टायगर श्रॉफच्या कारवर मोटार सायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळीबार केला. त्यात टायगर श्रॉफला गोळी लागलेली नसल्याचे समजते. त्यात अन्य दोन जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात एका व्यक्तीने काढलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे.

 तीन ते चार राऊंड फायर केल्याचा आवाज

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा जुहूतील पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून त्याच्या बीएमडब्ल्यू कारमधून घरी परतत असताना ही घटना घडली आहे.  टायगर श्रॉफची कार जात असताना तेथे त्याचे चाहते त्याची छबी टिपत असताना अचानक  दुचाकीवरुन आलेल्या तिघा व्यक्तींनी हा गोळीबार केला. गोळीबाराची तीन ते चार राऊंड फायर केल्याचा आवाज या व्हिडीओ ऐकायला येत आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  या घटनेनंतर या परिसरात प्रचंड घबराट पसरली. या  प्रकरणात आता गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे.

टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला

अभिनेता टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून त्याच्या कारमधून जात असताना पुष्पा पार्क परिसरात त्याचे चाहते त्याच्या सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मोटर सायकलवरुन आलेल्या तिघा जणांनी बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार केला. यावेळी अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफचा चालक आणि एक रिक्षा चालक जखमी झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यांना जखमी अवस्थेत नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात