AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवसाला बोलावून 14 वर्षाच्या मुलीवर गँगरेप, पुणे हादरलं!

वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.

वाढदिवसाला बोलावून 14 वर्षाच्या मुलीवर गँगरेप, पुणे हादरलं!
प्रातिनिधिक फोटो
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 29, 2021 | 1:40 PM
Share

पुणे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Pune gangrape) झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. त्यानंतर आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून त्यांनाही तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याने सांगून गोळीबार केल्याचा प्रकारही समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केल्यानंतर, चौकशीत 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी यातील 5 जणांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  या प्रकारामुळे पुणे परिसर हादरुन गेला आहे. 15 दिवसापूर्वी झालेली ही थरारक घटना आता उघडकीस आली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

15 दिवसापूर्वी  आरोपींनी पीडित मुलीला वाढदिवसासाठी बोलावलं होतं. वाढदिवसानिमित्त पार्टी असल्याचं सांगून 14 वर्षीय मुलीला बोलावलं. यावेळी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. नराधम यावरच थांबले नाहीत, त्यांनी आणखी दोन मित्रांना तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याचे सांगितले. पीडितेने या सर्वप्रकाराला विरोध केल्यानंतर, आरोपींनी चक्क गोळीबार केला.

याप्रकरणात पुणे गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. जनता वसाहतीत राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 5 जणांना ताब्यात घेऊन, त्यापैकी दोघांना अटक केली आहे. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

संबंधित बातम्या 

नालासोपाऱ्यात महिलेची हत्या, होळीच्या रात्री बॅगेत मृतदेह सापडला

विमानात थरार! त्याला राग आला, सीटवरुन उठला, एमरजन्सी डोअर जोरात उघडायला लागला, 89 प्रवाशांची धडधड

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...