विमानात थरार! त्याला राग आला, सीटवरुन उठला, एमरजन्सी डोअर जोरात उघडायला लागला, 89 प्रवाशांची धडधड

विकृत आणि विचित्र माणसं हे कुठेही असू शकतात. मग ते रस्त्यावर, रिक्षात, बसमध्ये, रेल्वेत किंवा उच्चभ्रूंच्या विमानातही असू शकतात (passenger try to open emergency gate in flight)

विमानात थरार! त्याला राग आला, सीटवरुन उठला, एमरजन्सी डोअर जोरात उघडायला लागला, 89 प्रवाशांची धडधड
एका प्रवाशामुळे 89 प्रवाशांचा जीव धोक्यात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

नवी दिल्ली : विकृत आणि विचित्र माणसं हे कुठेही असू शकतात. मग ते रस्त्यावर, रिक्षात, बसमध्ये, रेल्वेत किंवा उच्चभ्रूंच्या विमानातही असू शकतात. त्याचाच प्रत्यय शनिवारी (27 मार्च) नवी दिल्ली येथून स्पाईस जेटच्या विमानाने वाराणसीला जाणाऱ्या प्रवाशांना आला. नवी दिल्ली येथून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर आकाशात जेव्हा ते स्थिर झाले तेव्हा एक प्रवाशी रागाच्या भरात विमानाचा एमरजन्सी गेट उघडायला लागला. ते गेट सहजासहज उघडत नव्हतं म्हणून तो जोरात ताकद लावून ते गेट उघडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याची गंमत पाहणाऱ्या 89 प्रवाशांची धडधड वाढली होती (passenger try to open emergency gate in flight).

प्रवाशांनी माथेफिरुला पकडलं

एमजरन्सी गेट उघडलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता. 89 प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता. पण सुदैवाने विमानातील क्रू मेंबर्स आणि काही प्रवाशांनी त्या माथेफिरु प्रवाशाला ते करण्यापासून रोखलं. त्याला पकडून धरलं आणि त्याने पुन्हा तसा उपद्व्याप करु नये म्हणून त्याला चारही बाजूने जखडून ठेवलं. दोन प्रवाशांनी त्याला सलग चाळीस मिनिट पकडून ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय (passenger try to open emergency gate in flight).

वाराणसी विमानतळावर लँड होताच प्रवाशाला बेड्या

विमान वाराणसीला लँड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाबाबत एटीसीला माहिती देण्यात आली. सूचना मिळताच सुरक्षाकर्मी तिथे पोहोचले. त्यांनी आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी प्रवाशाला अटक केली असून त्याची मेडिकल ट्रिटमेंट केली. संबंधित प्रवाशाची मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नका; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजित पवारांचा इशारा