AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : धक्कादायक, CSMT-मसजिद दरम्यान Mumbai Local Train मध्ये मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

Mumbai Crime : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुंबईत चक्क सकाळच्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यावेळी लोकलच्या डब्ब्यात सुरक्षा रक्षक नव्हता.

Mumbai Crime : धक्कादायक, CSMT-मसजिद दरम्यान Mumbai Local Train मध्ये मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
Mumbai LocalImage Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2023 | 11:16 AM
Share

मुंबई : मुंबईत लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हार्बर लाईन मार्गावर एका तरुणीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी सकाळच्या सुमारास CSMT-मसजिद रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. विद्यार्थीनी परीक्षेसाठी हार्बर मार्गावरुन बेलापूर येथे चालली होती. त्यावेळी ही घटना घडली.

गुन्हा घडला त्याचदिवशी आरोपी नवाझु करीमला (40) अटक करण्यात आली. तो हमाल म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल डब्ब्यात सुरक्षा रक्षक कधी असतो?

रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान लोकलमधील महिलांच्या डब्ब्यात एक सुरक्षारक्षक तैनात असतो. याआधी सुद्धा मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत, त्यामुळे सुरक्षेसाठी महिलांच्या डब्ब्यात सुरक्षा रक्षकाची तैनाती केली जाते. पोलिसांनी आरोपी नवाझु करीमच्या विरोधात बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.

ट्रेनमध्ये काय घडलं?

पीडित मुलगी दक्षिण मुंबईमध्ये राहते. तिने सकाळी 7.27 च्या सुमारास सीएसएमटी-पनवेल लोकलमधील महिला डब्ब्यात प्रवेश केला. त्याच डब्ब्यात एक वयोवृद्ध महिला प्रवासी होती. ट्रेन सुरु होताच करीमने धावत ट्रेन पकडली. CSMT ते मसजिद या 3 ते 4 मिनिटांच्या प्रवासात त्याने विद्यार्थींनीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

धावत जाऊन जनरलच्या डब्ब्यात चढली

त्यावेळी डब्ब्यात असलेल्या सहप्रवासी महिलेने मदतीसाठी आरडा-ओरडा केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. विद्यार्थीनीने प्रतिकार केल्यामुळे आरोपीचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. मसजिद स्थानकात ट्रेन थांबताच ती ट्रेनमधून उतरली व धावत जाऊन जनरलच्या डब्ब्यात चढली. मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती

“पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती. पुरुष प्रवाशांनी काही घडलय का? म्हणून तिच्याकडे विचारणा केली. तिला काही मदत हवीय का? त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली” वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...