AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा करुण अंत

सिटी बसच्या अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मागून आलेल्या सुरत सिटी बसने तिला उडवले होते. बसखाली चिरडल्यामुळे शिवानी जखमी झाली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

CCTV | भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा करुण अंत
सुरतमध्ये तरुणीचा बसखाली चिरडून मृत्यूImage Credit source: ट्विटर
| Updated on: Mar 09, 2022 | 1:24 PM
Share

बडोदा : सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गुजरातमधील बडोद्यात हा धक्कादायक प्रकार घडला. रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला (College Student) मागून आलेल्या सुरत सिटी बसने (Surat City Bus) उडवले होते. मात्र बसखाली चिरडल्यामुळे (Bus Accident) जखमी झालेल्या युवतीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ऐन आंतरराष्ट्रीय महिला दिनीच हा धक्कादायक प्रकार घडला. अपघाताची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. शिवानी सोलंकी असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. शिवानी चालत असताना मागच्या बाजूने आलेल्या बसने तिला चिरडले होते. अपघातात तिला प्राण गमवावे लागले.

नेमकं काय घडलं?

सिटी बसच्या अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मागून आलेल्या सुरत सिटी बसने तिला उडवले होते. बसखाली चिरडल्यामुळे शिवानी जखमी झाली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

चालकाने बेदरकारपणे बस दामटवल्याचा आरोप

सुरत येथील एमएस युनिव्हर्सिटीमध्ये शिवानी सोलंकी शिकत होती. सिटी बस चालक जयेश परमार याने बेदरकारपणे गाडी चालवून तिला चिरडल्याचा आरोप आहे. सुरत शहर बस स्थानकात प्रवेश करताना ही घटना घडली.

ऐन महिला दिनीच प्रकार

ही घटना काल (मंगळवारी) सायंकाळी उशिरा घडली. ऐन आंतरराष्ट्रीय महिला दिनीच हा धक्कादायक प्रकार घडला. अपघाताची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पुण्यातील नवले पुलावर विचित्र अपघात ; २ जखमी; सात वाहनांचे नुकसान

बापरे !!! महाड मार्गावरील वरंधा घाटात दुचाकीसह दोघं दरीत

ट्रिपल सीट बाईकस्वारांना ट्रकची धडक, दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याला रुग्णालयात नेताना मृत्यूने गाठले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.