ट्रिपल सीट बाईकस्वारांना ट्रकची धडक, दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याला रुग्णालयात नेताना मृत्यूने गाठले

अपघातात दुचाकीस्वार शे. सत्तार आणि अलकेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर शे. तनवीर गंभीर जखमी झाल्याने त्याला अमरावतीला रेफर करण्यात आले, मात्र त्याचाही वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ट्रिपल सीट बाईकस्वारांना ट्रकची धडक, दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याला रुग्णालयात नेताना मृत्यूने गाठले
अमरावती बाईक-ट्रकचा भीषण अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:10 AM

अमरावती : बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात (Bike Truck Accident) झाल्याची घटना अमरावतीत समोर आली आहे. यामध्ये तिघा जणांना प्राण गमवावे लागले. अमरावती जिल्ह्यातील (Amravati) चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावर कुरळपूर्णा फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोघे जण जागीच मृत्युमुखी पडले, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्री हा अपघात झाला. शे. शागीर शे. हबीब (वय 40 वर्ष), शे. तनविर शे. सत्तार (वय 35 वर्ष) आणि अलकेश पप्पू सलामे (वय 22 वर्ष) (तिघेही रा. कुरळ पुर्णा) अशी मृत्युमुखी पडलेल्या बाईकस्वारांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

रविवारी रात्री कुरळ येथील शे. शागीर शे. हबीब, शे. तनविर शे. सत्तार आणि अलकेश पप्पू सलामे हे तिघेही दुचाकीने परतवाडा मार्गावरुन आपल्या कुरळ पुर्णा येथील घरुन चांदूरबाजारला येत होते. वैभव केळकर यांच्या शेतानजीक परतवाडा वाय पॉईंटवर मागून येणार्‍या ट्रक नं. एमएच 20 बीएच 3612 या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

दोघांचा जागीच मृत्यू, एकाने वाटेत प्राण सोडले

अपघातात दुचाकीस्वार शे. सत्तार आणि अलकेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर शे. तनवीर गंभीर जखमी झाल्याने त्याला अमरावतीला रेफर करण्यात आले, मात्र त्याचाही वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

स्पीड ब्रेकरजवळ बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांचं बाळ जागीच मृत्युमुखी, आई-वडील गंभीर

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.