नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की विनोद राजपूत यांचे मुंडके आणि धड वेगवेगळे झाले. राजपूत यांच्या बाईकला धडक देणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू
धुळ्यात बाईक अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 11:47 AM

धुळे : बाईक अपघातात (Bike Accident) पिता पुत्राचा मृत्यू (Father Son Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी जाताना हा अपघात झाला. धुळ्यातील (Dhule) भडणे फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. लहान मुलाला सोबत घेऊन पिता मोटरसायकलने जात होता. यावेळी अज्ञात वाहनासोबत त्यांच्या बाईकची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार पित्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात बाईकस्वाराचे धड आणि शिर वेगळे झाले. तर गंभीर जखमी झालेल्या लहान मुलाने उपचारादरम्यान प्राण सोडले. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना अपघात

प्राथमिक माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण या गावातील विनोद राजपूत हे सुरत येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी सुरत येथून आपल्या गावी आले होते नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी विनोद राजपूत हे त्यांचा लहान मुलगा कृष्णासोबत मोटरसायकलने जात होते.

पित्याचा जागीच मृत्यू, मुलगा उपचारावेळी मृत्युमुखी

यावेळी भडणे फाट्याजवळ भडगाव भागात अज्ञात वाहनासोबत त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. यात विनोद राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मुलगा कृष्णाला रुग्णालयात दाखल केले. तिथून धुळ्याला घेऊन जात असताना मुलाचा मृत्यू झाला.

डंपर चालक ताब्यात

हा अपघात इतका भीषण होता की विनोद राजपूत यांचे मुंडके आणि धड वेगवेगळे झाले. राजपूत यांच्या बाईकला धडक देणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित बातम्या :

तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

अचानक चाक निखळले, ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर एसटीवर पडला, सोलापुरात विचित्र अपघात

आधी वडील गेले, आता लग्नाच्या तोंडावर लेकाचाही मृत्यू, बाईक अपघातात बालमित्रांचा करुण अंत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.