अचानक चाक निखळले, ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर एसटीवर पडला, सोलापुरात विचित्र अपघात

सागर सुरवसे

सागर सुरवसे | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Mar 05, 2022 | 7:49 AM

चालत्या एसटीवर ऊसाचा ट्रेलर कलल्यामुळे विचित्र अपघात झाला. माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला होता.

अचानक चाक निखळले, ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर एसटीवर पडला, सोलापुरात विचित्र अपघात
सोलापुरात एसटी बसला अपघात
Image Credit source: टीव्ही9

सोलापूर : चालत्या एसटीवर ऊसाचा ट्रेलर कलल्यामुळे विचित्र अपघात (ST bus accident) झाला होता. सुदैवाने यामध्ये मोठी दुर्घटना टळली. मात्र वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील (Madha Solapur) रोकडोबा मंदिरासमोर हा अपघात झाला. यानंतर जवळपास तीन तास ट्राफिक जाम झाला होता. माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला. यात मोठा अनर्थ टळला असला तरी तीन तास कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चालत्या एसटीवर ऊसाचा ट्रेलर कलल्यामुळे विचित्र अपघात झाला. माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला होता.

नेमकं काय घडलं?

सोलापूरहून कुर्डूवाडीकडे प्रवासी घेऊन चाललेली बस रोकडोबा मंदिरासमोरुन जात होती. त्याच वेळी ऊसाचा ट्रेलरही चालला होता. अचानकच ट्रॅक्टरच्या ट्रेलरचे चाक निघाले. त्यामुळे ऊसाच्या ट्रेलरचा लोड एसटी बसवर पडला.

तीन तास वाहतूक कोंडी

दरम्यान एसटीतील प्रवाशांना खाली उतरवण्याची तत्परता चालक आणि वाहकांनी दाखवली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जेसीबीच्या मदतीने ऊसाचा ट्रेलर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेमुळे मात्र मोठी वाहतूक कोंडी झाल्याने शेकडो वाहन धारक ताटकळले होते.

संबंधित बातम्या :

आधी वडील गेले, आता लग्नाच्या तोंडावर लेकाचाही मृत्यू, बाईक अपघातात बालमित्रांचा करुण अंत

डिझेल संपल्याने ट्रॅक्टर थांबलेला, मागून बाईक जोरात आदळली, तरुणाचा जागीच मृत्यू

बसची बाईकला जोरदार धडक, तिघा जीवलग मित्रांचा करुण अंत

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI