बीड : बाईक अपघातात तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Bike Accident) समोर आली आहे. बीडमध्ये (Beed) घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकवरुन प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या तरुणाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule Solapur National Highway) खजाना विहिरीजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिघेही जण बुलेटवरुन बीडच्या दिशेने येत असताना समोरुन येणाऱ्या बसने त्यांना उडवलं. ही धडक इतकी जबर होती, की दोघांचा जागीच अंत झाला, तर उपचार सुरु असताना तिसऱ्या मित्राने प्राण गमावले.