तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

नागपुरात दहावीच्या तिघा विद्यार्थ्यांचा रस्त्यात अपघात झाल्याचं उघडकीस आलं आहे. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना ही घटना घडली.

तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
नागपुरात दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:42 AM

नागपूर : नागपुरात दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघात (Students Accident) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. विद्यार्थ्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिली होती. यामध्ये बाईकवरील विद्यार्थी जागीच मृत्युमुखी पडला, तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर (Nagpur Bike Accident) ही घटना घडली. दिशांत महादेव पटेल असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले सर्व विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे आहेत.

नेमकं काय घडलं?

नागपुरात दहावीच्या तिघा विद्यार्थ्यांचा रस्त्यात अपघात झाल्याचं उघडकीस आलं आहे. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना ही घटना घडली.

विद्यार्थी प्रवास करत असलेल्या बाईकला एका वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये बाईकवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

एकाचा मृत्यू, दोघे जखमी

दिशांत महादेव पटेल असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले सर्व विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दिशांतच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या शाळेसह परिवार आणि शेजाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या :

अचानक चाक निखळले, ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर एसटीवर पडला, सोलापुरात विचित्र अपघात

आधी वडील गेले, आता लग्नाच्या तोंडावर लेकाचाही मृत्यू, बाईक अपघातात बालमित्रांचा करुण अंत

डिझेल संपल्याने ट्रॅक्टर थांबलेला, मागून बाईक जोरात आदळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.