AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suicide | चार लग्नं मोडली, पाचवी बायको दागिन्यांसह पळाली, उद्विग्न तरुणाची आत्महत्या

संबंधित युवकाचं याआधी चार वेळा लग्न झालं होतं. मात्र सगळ्या लग्नगाठी काही ना काही कारणाने तुटल्या. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या तरुणीसोबत पाचव्यांदा त्याची लग्नगाठ जुळली.

Suicide | चार लग्नं मोडली, पाचवी बायको दागिन्यांसह पळाली, उद्विग्न तरुणाची आत्महत्या
पालघरमधील हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यशImage Credit source: टीव्ही9
| Updated on: Mar 29, 2022 | 12:46 PM
Share

अहमदाबाद : चार वेळा लग्नं केलं, मात्र एकही टिकलं नाही. पाचव्या विवाहानंतर तरी आयुष्यभराची सहचारिणी मिळेल, या आशेने तो पुन्हा बोहल्यावर चढला. मात्र या वेळीही नशिबाने धोका दिला. पाचवी बायको घर सोडून पळाली, ती सोबत दीड लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन. या घटनेचा तरुणाला इतका धक्का बसला, की त्याने आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचललं. गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची पाचवी बायको मुंबईजवळच्या नालासोपारा शहरातील रहिवासी होती. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईला सापडलेल्या सुसाईड नोटमधून (Suicide Note) या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

संबंधित युवकाचं याआधी चार वेळा लग्न झालं होतं. मात्र सगळ्या लग्नगाठी काही ना काही कारणाने तुटल्या. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या तरुणीसोबत पाचव्यांदा त्याची लग्नगाठ जुळली. आज तकच्या वेबसाईटवर यासंदर्भात बातमी देण्यात आली आहे.

सोन्याचे दागिने घेऊन बायको पसार

लग्नानंतर काहीच दिवसात तरुणाची नवविवाहित बायको दीड लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली. त्यामुळे उद्विग्न झालेल्या तरुणाने विष प्राशन करुन आयुष्याची अखेर केली. तरुणाकडे सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये सात जणांची नावं आहेत.

आईला सुसाईड नोट सापडली

अहमदाबादमधील असलाली पोलीस ठाण्यात तरुणाच्या आईने तक्रार दाखल केली होती. मुलाने आत्महत्या केल्यानंतर आई त्याच्या खोलीत साफसफाई करत होती. त्यावेळी मुलाच्या उशीखाली त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. ‘राजू भाई, आशा बहन, अश्विन वलसाड, राणी, राणीची आई अशा सर्वांनी मला त्रास दिला’ असं यात लिहिलं होतं.

तणावातून मुलाचं विषप्राशन

आपली पाचवी सून पैसे आणि सोन्याचे दागिने घेऊन फरार झाली होती. त्यानंतर मुलगा तणावात असायचा. त्रस्त होऊन त्याने विष पिऊन जीव दिला, असा दावा त्याच्या आईने केला. सध्या सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्या व्यक्तींवर केस दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

भुसावळमध्ये लग्नाआधीच मुलीचा हुंड्यासाठी छळ, लग्न मोडण्याची धमकी; अखेर तरुणीने उचलले हे टोकाचे पाऊल

बाबा माफ करा, मी तुमचं स्वप्न… वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.