Aurangabad | बाबा माफ करा, मी तुमचं स्वप्न… वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Aurangabad | बाबा माफ करा, मी तुमचं स्वप्न... वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या
Image Credit source: टीव्ही9

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. अभ्यासाच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

दत्ता कानवटे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 27, 2022 | 10:29 AM

औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभ्यासाच्या तणावातून तिने आयुष्याची अखेर केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला. गळफास घेऊन विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवली. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय आणि महाविद्यालयात ती तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. सॉरी बाबा, मी डॉक्टर होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू न शकल्याने माफ करा, अशी चिठ्ठी (Suicide Note) लिहून तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. वैष्णवी रमेश काकडे असं 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे.

अभ्यासाच्या तणावातून आत्महत्येचा अंदाज

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. अभ्यासाच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

वैष्णवी रमेश काकडे (वय 22 वर्ष, रा. धानोरा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय आणि महाविद्यालयात ती तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती.

वडिलांच्या नावे सुसाईड नोट

गळफास घेऊन तिने आपल्या आयुष्याची अखेर केली. सॉरी बाबा..मी डॉक्टर होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करु न शकल्याने माफ करा, अशी सुसाईड नोट तिने आत्महत्येपूर्वी लिहिल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

आठवीपासून रिलेशनशीपमध्ये, एका भांडणाने सारं उद्ध्वस्त, गर्लफ्रेण्डच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही स्वतःला संपवलं

लायब्ररी सांगून OYO Hotel मध्ये गेली, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आई-वडिलांना तीन पानी चिठ्ठी

Nanded | महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या, नांदेडमध्ये खळबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें