AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

42 वर्षीय महिला राहत्या घरी मृतावस्थेत, मुलगा म्हणतो आईसोबत राहणाऱ्या पार्टनरने तिला संपवलं

हरियाणातील गुरुग्राममधील कन्हाई कॉलनीत राहणारी 42 वर्षीय महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. महिलेसह घरात राहणारा संबंधित पुरुष फरार झाला आहे. त्यामुळे हत्या प्रकरणात तो संशयाच्या फेऱ्यात आहे

42 वर्षीय महिला राहत्या घरी मृतावस्थेत, मुलगा म्हणतो आईसोबत राहणाऱ्या पार्टनरने तिला संपवलं
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
| Updated on: Mar 03, 2022 | 10:36 AM
Share

चंदिगढ : हरियाणातील गुरुग्राममधील (Gurugram Haryana) कन्हाई कॉलनीत राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेचा मृतदेह ती भाड्याने राहत असलेल्या घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याविषयी बुधवारी ही माहिती दिली. महिलेच्या मानेवर खुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गळा आवळून महिलेचा खून (Murder) करण्यात आल्याचा संशय आहे. मध्य प्रदेशातील पन्ना येथील रहिवासी असलेली कमला देवी सध्या गुरुग्राममध्ये एका पुरुषासोबत राहत होती. मंगळवारी ती राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. आईसोबत राहणाऱ्या सुरेंद्रनेच तिची हत्या केली, असा आरोप तिचा मुलगा बळीरामने केला आहे.

काय आहे प्रकरण?

हरियाणातील गुरुग्राममधील कन्हाई कॉलनीत राहणारी 42 वर्षीय महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. महिलेसह घरात राहणारा संबंधित पुरुष फरार झाला आहे. त्यामुळे हत्या प्रकरणात तो संशयाच्या फेऱ्यात आहे. गुरुग्राममधील सुशांत लोक पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. आरोपी अद्याप फरार आहे. आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सुशांत लोक पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर जसवीर यांनी सांगितले.

महिलेच्या मुलाचा दावा

मयत महिलेचा मुलगा बळीरामच्या तक्रारीनुसार, त्याचे वडील महेश तीन वर्षांपूर्वी दोघांना सोडून गेले. त्यानंतर तो आईसोबत राहू लागला. त्यांच्या जोडीने मजुरी करणारा सुरेंद्रही त्यांच्यासोबत राहत होता. सुरेंद्र आधी वजिराबाद गावात राहत होता. मात्र पाच महिन्यांपासून तो आमच्यासोबत कन्हाई कॉलनीत राहू लागला. सुरेंद्रचं आईसोबत वारंवार भांडण व्हायचं, असंही बळीरामने सांगितलं.

सुरेंद्रला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. मंगळवारी संध्याकाळीही त्याचे आईसोबत वाद झाले होते. मात्र आपण एका मित्रासोबत वजिराबादला गेलो होतो. रात्री तिथेच थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास कन्हाई कॉलनीतील घरी मी पोहोचलो, तेव्हा आई मृतावस्थेत होती, तर सुरेंद्र गायब होता. त्यानेच माझ्या आईची हत्या केली, असा आरोप बळीरामने केला आहे.

संबंधित बातम्या :

Nanded Murder | घरासमोर कचरा टाकण्यावरुन भावकीत वाद, दोघा सख्ख्या भावांची हत्या

प्रियकर-प्रेयसी हॉटेल रुममध्ये, तरुणीला आलेल्या एका फोनमुळे बॉयफ्रेण्डकडून हत्या

नांदेडमध्ये बापलेकाची हत्या, वडिलांचा मृतदेह पोलिसांनी उकरुन काढला, अल्पवयीन मुलगा बेपत्ता

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.