AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुनी नर्स… एका मागून एक 10 रुग्णांना तडफडत मारलं… अजून 27 जणांचा गेम करणार तोच… काय घडलं नेमकं ? नर्स का उठली जीवावर?

Crime News : 10 रुग्णांची हत्या आणि 27 जणांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नर्सला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रात्रीच्या ड्युटीच्या वेळेस ती रुग्णांना जीवघेणी औषधं द्यायची कारण...

खुनी नर्स... एका मागून एक 10 रुग्णांना तडफडत मारलं... अजून 27 जणांचा गेम करणार तोच... काय घडलं नेमकं ? नर्स का उठली जीवावर?
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: Getty Images
| Updated on: Nov 07, 2025 | 3:04 PM
Share

डॉक्टर आणि नर्स यांना जीव वाचवणारं म्हटलं जातं. देवाचं दुसरं स्वरूप मानलं जातं. पण तेच जीवावर उठले तर ? जर्मनीच्या रुग्णालयातील एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एक नर्स, रुग्णांची काळजी घेण्याचं जिचं काम होतं, तीच त्या रुग्णांच्या मृत्यूचं कारण ठरली. न्यायालयाने त्या नर्सला 10 रुग्णांची हत्या आणि 27 जणांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेपेचे कठोर शिक्षा ठोठावली.

रात्रीच्या ड्युटीला द्यायची जीवघेणं इंजेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, या घटना डिसेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान पश्चिम जर्मनीतील वुअरसेलेन (Wuerselen) शहरातील एका रुग्णालयात घडल्या. या नर्सचे नाव अद्याप उघड झालेले नाही, तिने रात्रीच्या शिफ्टमध्ये वृद्ध रुग्णांना मोठ्या प्रमाणात वेदनाशामक आणि झोपेची औषधे दिली असा दावा कोर्टात सरकारी वकिलांकडून करण्यात आला.  ते रुग्ण लवकर झोपावेत आणि तिला रात्रभर मेहनत करावी लागू नये हा तिचा (औषधं देण्यामागचा) हेतू होता. तिने अनेक रुग्णांना मॉर्फीन आणि मिडाजोलम नावाच्या औषधांचे प्रमाणापेक्षा जास्त डोस दिले, असं तपासात उघड झालं. ही औषधं इतकी तीव्र होती की ती प्राणघातक देखील ठरू शकतात.

” जीवन-मरणाची झाली स्वामी

न्यायालयात सरकारी वकिलांनी सांगितलं की, त्या रुग्णांना जास्त लक्ष आणि वेळ हवा होता त्यांच्यामुळे नर्स चिडली. आरोपी स्वतःला “जीवन आणि मृत्यूचा स्वामी” मानू लागली. म्हणजेच, कोणी जगावं आणि कोणी जगू नये हे तीच ठरवू लागली, असं ते (वकील) म्हणाले. या नर्सने 2007 साली मध्ये तिचे नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केले होते. ती या रुग्णालयात 2020 सालापासून काम करत होती.

गुन्हा खूप गंभीर

पोलिसांनी 2024 मध्ये तिला अटक केली. हा खटला जेव्हा न्यायालयात पोहोचला तेव्हा हा गुन्हा “अत्यंत गंभीर” असल्याचे मत न्यायालयाने नोंदवलं. त्या नर्सचे गुन्हे इतके गंभीर आहेत की 15 वर्षांनंतरही तिला सुटकेची संधी देऊ नये असा निर्णय  न्यायाधीशांनी दिला.

या नर्सने आणखी काही रुग्णाची देखील हत्या केली का, याचा तपास सध्या तपास यंत्रणा करत आहेत. यासाठी, अनेक मृतदेह बाहेर काढले जात आहेत आणि नवीन बळींची ओळख पटवण्यासाठी त्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. जर आणखी पुरावे सापडले तर नर्सवर नवीन खटला चालवला जाऊ शकतो.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा