थेट वरिष्ठ अधिकाऱ्याला आत्महत्या करणार असा व्हिडिओ शेयर केल्याने खळबळ

| Updated on: Oct 07, 2022 | 5:08 PM

नाशिकमधील एका कॉन्स्टेबलने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ शेयर केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती.

थेट वरिष्ठ अधिकाऱ्याला आत्महत्या करणार असा व्हिडिओ शेयर केल्याने खळबळ
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : मागील आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यात हवालदाराने वरिष्ठांच्या जाचाला स्वतःवरच गोळ्या झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली. ही घटना ताजी असतांना नाशिक शहर (Nashik City Police) पोलीस दलातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अंमलदाराच्या जाचाला कंटाळून एका कॉन्स्टेबलने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविल्याने खळबळ उडाली आहे. कॉन्स्टेबलने व्हिडिओ शेयर (Video) करताच रात्रीच्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलची भेट घेत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच अंमलदार यांनी दिलेल्या त्रासाची मालिका मांडत कैफत मांडली. एकूणच या घटनेची वाच्यता होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यानी घेतली असली तरी पोलीस दलात सुरू असलेल्या दबक्या आवाजातील चर्चेने ती बाहेर आली आहे.

राज्यातील कुठल्या पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आणि अंमलदार यांच्यात वाद होतच असतात. मर्जीतील कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावण्यापासून इतर कामांपर्यन्त सर्वच बाबींचा त्यात सहभाग असतो.

याच कारणावरून मागील आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यात वारिष्ठांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून घेत एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती.

हे सुद्धा वाचा

आठवडा उलटत नाही तोच नाशिकमधील एका कॉन्स्टेबलने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ शेयर केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती.

संबंधित प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समजुतीने वादावर पडदा टाकण्याचा आणि समजूत घालण्याचा प्रयत्न झाला असला तरी पोलीस आयुक्तांपर्यन्त ही बाब गेल्याची माहिती आहे.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी याबाबत दखल घेतली असून चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्तांच्या चौकशीने हे प्रकरण पुन्हा सुरू झाले आहे.

एकूणच या प्रकरणामुळे नाशिक पोलीस दलात जाच किंवा त्रास देणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे धाबे चांगलेच दणाणले असून कुणी वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही याची सोय केली जात आहे.