AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीने तिचा मोबाईल हातातून खेचला आणि तिने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, पतीला गुवाहटीमधून अटक

घटनेच्या दिवशी शिजान आणि क्रषिका यांचे जोरदार भांडण झाले, क्रषिका हीचा फोन तपासून पाहताना काही मॅसेज डीलीट केलेले आढळले. त्यावरुन त्याने तिला जाब विचारला. घाबरलेल्या क्रिषिका हीने सरळ शेजारील टॉवरवरून उडी मारली.

पतीने तिचा मोबाईल हातातून खेचला आणि तिने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, पतीला गुवाहटीमधून अटक
CRIME (1)Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 08, 2023 | 3:49 PM
Share

मुंबई : क्रिषिका आपल्याला फसवत असल्याचा शिजान याला संशय होता. त्याने तिचा मोबाईल ( MOBILE ) खेचत तिचे व्हॉट्सअपचे सर्व मॅसेज तपासले, काही मॅसेज तिने डीलीट ( DELETE ) केल्याचे त्याला आढळले. त्यावरून शिजान अधिकच संतापला आणि त्याने तिला डीलीट केलेले मॅसेज पुन्हा मिळवता येतात अशी धमकी देत तो तिचा मोबाईल घेऊन घराबाहेर पडला आणि  त्यामुळे घाबरलेल्या क्रिषिकाने थेट इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून स्वत: ला संपविले. या प्रकरणात पतीला पत्नीस आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याप्रकरणी बांगूर पोलीसांनी गुवाहाटीतून पतीला अटक केली आहे.

क्रिषीका थापा ( वय 30  ) या मालाडला ब्युटीशीयन म्हणून काम करतात. गोरेगाव पश्चिमकडील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केल्याने तिची पती शिजान याला मंगळवारी गुवाहाटीतून बांगूर नगर पोलीसांनी अटक केली. गोरेगाव पश्चिमेकडील लक्ष्मी नगरातील गुलजार इमारती जवळ भाड्याने रहाणाऱ्या शिजान आणि त्याची पत्नी क्रीशिका यांच्यात जोरदार भांडण झाले.

क्रिषिका आपल्याला फसवत असल्याचा शिजान याला संशय होता. त्याने तिचा मोबाईल तिच्याकडून घेत डिलीट केलेले मॅसेज रिक्रीट करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या क्रिषिका हीने त्यांच्या शेजारील टॉवरच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर  घाबरलेला शिजान गुवाहटीत पळून गेला. पोलीसांनी त्याला शोधून आणत मंगळवारी अटक केली.

25 जानेवारीला गोरेगावच्या गुलजार टॉवरवरून खाली पडलेला महिलेचा मृतदेह सापडला असल्याचा कॉल बांगूरनगर पोलीसांना आला. चौकशीत या टॉवरमध्ये कोणी ओळखत नसल्याचे पोलीसांना समजले.

घटनेच्या दिवशी शिजान आणि क्रिषिका यांचे जोरदार भांडण झाले. त्यावेळी क्रिषिका हीचा फोन तपासून पाहताना काही मॅसेज डीलीट केलेले आढळले. त्यावरुन त्याने तिला जाब विचारला. त्यानंतर त्याने हे मॅसेज पुन्हा मिळविण्याची तिला धमकी दिली. आणि तिचा मोबाईल फोन घेऊन शिजान तावातावाने घराबाहेर पडला. त्यामुळे घाबरलेल्या क्रिषिका हीने सरळ शेजारील टॉवर जाऊन सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेनंतर शिजान गुवाहटीला पळून गेला, बांगूर नगर पोलीसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीवर पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....