AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करत कार पळवली, कुठे घडली घटना?

काम आटोपून रात्री घरी जायला मॅनेजर निघाले. स्वतःच्या गाडीने मॅनेजरने घरी जायला निघाले, मात्र घरापर्यंत पोहचू शकले नाही. वाटेतच त्यांच्यासोबत जे घडलं ते फार धक्कादायक होतं.

मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करत कार पळवली, कुठे घडली घटना?
नाशिकमध्ये हल्ल्यात मॅनेजरचा मृत्यूImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 24, 2023 | 12:41 PM
Share

नाशिक / चंदन पुजाधिकारी : काम संपवून घरी चाललेल्या मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. मॅनेजरवर हल्ला केल्यानंतर आरोपींनी त्याची कार पळवून नेली. गंभीर जखमी मॅनेजरला एका रिक्षा चालकाने तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव साहेब आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पहाणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

काम आटोपून घरी जात असताना घडली घटना

पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ ही घटना घडली. एका कंपनीत पदावर कार्यरत असलेले मॅनेजर काम आटोपून घरी चालले होते. यावेळी मॅनेजरची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यांनतर त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या हल्ल्यात गंभीर जखमी मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमी मॅनेजरला तात्काळ रुग्णालयात नेले पण…

गरवारे येथील सर्विस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे ही घटना घडली. मॅनेजर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी तेथून जाणाऱ्या एका रिक्षा चालकाने त्यांना पाथर्डी फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार