AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवदर्शनासाठी चालले होते कुटुंबीय, अचानक रानडुकरांनी रिक्षावर हल्ला केला, मग…

वेल्हे येथे जोगोबा देवाच्या दर्शनासाठी एक कुटुंब रिक्षाने चालले होते. या रिक्षावर रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षा 300 फूट दरीत कोसळली.

देवदर्शनासाठी चालले होते कुटुंबीय, अचानक रानडुकरांनी रिक्षावर हल्ला केला, मग...
रानडुकरांच्या हल्ल्यानंतर रिक्षा दरीत कोसळलीImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 25, 2023 | 4:10 PM
Share

पुणे / विनय जगताप : रानडुकरांनी रिक्षावर केलेल्या हल्ल्यात रिक्षा 300 फूट खोल दरीत कोसळून 1 जण ठार, तर 3 जण जखमी झाल्याची घटना घडली. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील वरघड गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. देवदर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. घटनेनंतर स्थानिकांनी मृत व्यक्ती आणि जखमींना खोल दरीतून बाहेर काढलं. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आणि जखमींना वनविभागाने तातडीने मदत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

देवदर्शनासाठी जात असताना रानडुकरांनी रिक्षावर केला हल्ला

वेल्हे तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या वरघड येथील जोगोबा देवाच्या दर्शनासाठी पीडित कुटुंब चालले होते. यावेळी त्यांच्या रिक्षावर उन्मत रानडुकरांनी अचानक हल्ला केला. यात रिक्षा 300 फूट दरीत कोसळल्याने यात काकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. कुटुंबातील अन्य दोन सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत.

स्थानिक रेस्क्यू टीमने मयत आणि जखमींना काढले बाहेर

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले, मारूती मरगळे, सुनिल मरगळे, नितीन ढेबे, संतोष साळेकर यांनी खोल दरीतून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. मयत आणि जखमींना वनविभागाने मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती मरगळे आणि स्थानिकांनी केली आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा