बेपत्ता महिलेचा शोध घेत होते पोलीस, वारंवार जबाब बदलत असल्याने पतीवर संशय आला; चौकशीत जे समोर आले ते ऐकून पोलीसही चक्रावले

दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी येथील रेणुका खातून ही महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती. रेणुकाशी संपर्क होत नव्हता आणि मोहम्मदही समाधानकारक उत्तर देत नव्हता.

बेपत्ता महिलेचा शोध घेत होते पोलीस, वारंवार जबाब बदलत असल्याने पतीवर संशय आला; चौकशीत जे समोर आले ते ऐकून पोलीसही चक्रावले
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवले
Image Credit source: Google
वैजंता गोगावले | Updated on: Jan 06, 2023 | 2:36 PM

सिलीगुडी : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे दोन तुकडे करत नदीत फेकल्याची घटना पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मोहम्मद अंसारुल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. महिलेचा मृतदेह अद्याप मिळाला नसून पोलीस मृदेहाचा शोध घेत आहेत. रेणुका खातून असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

अनेक संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केली

दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी येथील रेणुका खातून ही महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती. रेणुकाशी संपर्क होत नव्हता आणि मोहम्मदही समाधानकारक उत्तर देत नव्हता. महिलेची काहीच माहिती मिळत नसल्याने रेणुकाच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार सिलीगुडी पोलीस ठाण्यात दाखल केली.

पतीवर संशय आल्याने कसून चौकशी केली

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महिलेचा शोध सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या पतीवर संशय आला. पोलीस त्याची चौकशी करत होते. मात्र प्रत्येक वेळी तो आपला जबाब बदलत होता. यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी पतीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याची कबुली

आरोपीने सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रेणुकाचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा मोहम्मदला संशय होता. याच संशयातून त्याने 24 डिसेंबर रोजी पत्नी रेणुकाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे दोन तुकडे केले आणि महानंदा नदीत फेकले. पोलीस नदीत मृतदेहाचा शोध घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us