AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईची एक शंका अन् मोठं हत्याकांड समोर, जळगावात तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकललं

जळगावात रेल्वे रुळावर आढळलेल्या मृतदेहाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. सुरुवातीला अपघात वाटणारी घटना पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले. हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादामुळे ही हत्या घडली.

आईची एक शंका अन् मोठं हत्याकांड समोर, जळगावात तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकललं
jalgaon
| Updated on: Nov 19, 2025 | 1:05 PM
Share

जळगाव शहरात तीन दिवसांपूर्वी रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. जळगावात मध्यरात्री प्रजापत नगराजवळील रेल्वे रुळावर आढळून आलेल्या या मृतदेहाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. सुरुवातीला रेल्वे अपघाताचे प्रकरण वाटणाऱ्या या घटनेत जबरदस्त ट्वीस्ट आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर हा पूर्वनियोजित खुनाचा प्रकार असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

हर्षल प्रदीप भावसार (३१) हा जळगावातील दिनकर नगर इथे राहतो. तो तानाजी मालुसरे नगरात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबरच्या रात्री हर्षल हा आईला जेवण देऊन बाहेर पडला. यानंतर जळगावच्या खेडी रोड परिसरातील ओंकार हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्याचा भूषण संजय महाजन, लोकेश मुकुंदा महाजन आणि परेश संजय महाजन या तिघांशी वाद झाला. केवळ एका अपमानास्पद शब्दावरून त्या तिघांमध्ये किरकोळ वादावादी झाली. हॉटेलमध्ये सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर तात्काळ हाणामारीत झाले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपींनी हर्षलला प्रथम हॉटेल आणि काशिबाई शाळेच्या मागील रस्त्यावर निर्दयीपणे मारहाण केली. यात हर्षल गंभीर जखमी झाला. यानंतर त्या तिघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला दुचाकीवरून उचलून तानाजी मालुसरे नगरातील शेतात नेले. तेथे पुन्हा मारहाण केली. त्यानंतर हा अपघात असल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी हर्षलला उचलून जळगाव-भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर फेकून दिले. धावत्या रेल्वेखाली आल्याने हर्षलचा अपघाती मृत्यू झाला, असे भासवण्याचा आरोपींचा डाव होता.

अपघात नसून घातपात

मात्र हर्षलचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याची शंका त्याची आई ज्योती प्रदीप भावसार यांना आली. त्यांनी ही शंका व्यक्त केल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी त्यानुसार कसून तपास सुरू केला. आईने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा (कलम 302) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींपैकी एक भूषण संजय महाजन याला अटक केली आहे. इतर दोन आरोपी लोकेश महाजन आणि परेश महाजन यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...