प्रयत्न करुनही नोकरी मिळत नसल्याने उच्चशिक्षित तरुणाने जीवन संपवलं; अखेरच्या चिठ्ठीत लिहिलं, “पप्पा, मम्मी…”

त्याचे आई-वडील आणि भाऊ लग्नासाठी इगतपुरीला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

प्रयत्न करुनही नोकरी मिळत नसल्याने उच्चशिक्षित तरुणाने जीवन संपवलं; अखेरच्या चिठ्ठीत लिहिलं, पप्पा, मम्मी...
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 2:04 PM

Jalgaon Crime : प्रयत्न करुनही नोकरी मिळत नसल्याने एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. जळगावात शहरातील अयोध्या नगरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. निलेश सुरेश सोनावणे (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

जळगावातील अयोध्या या ठिकाणी राहणाऱ्या निलेशचे शिक्षण पदव्युत्तरपर्यंत झालेले होते. हा तरुण आई-वडील आणि मोठ्या भावासह अयोध्या नगरात राहत होता. त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता. पण गेल्या काही दिवसांपासून नोकरी मिळत नसल्याने तो तणावात होता. मंगळवारी 9 जुलै रोजी त्याचे आई-वडील आणि भाऊ लग्नासाठी इगतपुरीला गेले होते. त्यावेळी निलेश हा एकटाच घरी होता. यावेळी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोटही सापडली

आत्महत्या करण्यापूर्वी निलेशने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. त्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहिले होते. ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय, असे त्याने लिहिले होते.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून तपास सुरु

रात्री 10 वाजता त्याचे मित्र घरी पोहोचले, तेव्हा निलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्याचे आई-वडील, मोठा भाऊ यांना धक्का बसला आहे. निलेशचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.