बहिणीच्या नवऱ्यासोबत बेडरुममध्ये शिजत होतं कांड, पाठून पती आला अन्… नंतर जे घडलं सर्वजण झाले चकीत

झारखंडच्या गोड्डा येथून भावोजी-सालीचा एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघेही बेडरूममध्ये नको ते कांड करत होते. त्याचवेळी पती बेडरूममध्ये अचानक धडकला. त्यानंतर जे घडलं ते थक्क करणारं होतं. चला, तुम्हाला संपूर्ण प्रकरण सांगतो...

बहिणीच्या नवऱ्यासोबत बेडरुममध्ये शिजत होतं कांड, पाठून पती आला अन्... नंतर जे घडलं सर्वजण झाले चकीत
Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 18, 2025 | 3:48 PM

तुम्ही ही म्हण ऐकली असेलच, ‘साली आधी घरवाली होती हे’, पण आजकाल अशा घटना घडत आहे की ही म्हण अक्षरश: पूर्ण होताना दिसत आहेत. झारखंडच्या गोड्डा येथे एक भावोजी आणि साली गुपचूप संबंध बनवत होते. यापूर्वीही त्यांनी अनेकदा असे संबंध प्रस्थापित केले होते, पण यावेळी सालीच्या पतीने त्यांना कांड करताना पकडलं. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. चला, तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की प्रकरण काय आहे.

खरं तर, झारखंडच्या गोड्डा येथे भावोजी आणि साली बेडरूममध्ये संबंध बनवत होते. त्याचवेळी पती बेडरूममध्ये अचानक धडकला. पतीने दोघांना संबंध बनवताना पाहिल्यावर त्याला राग अनावर झाला. पतीला पाहून पत्नीचे धाबे दणाणले आणि ती पतीच्या पायांवर पडली. माफी मागण्याच्या बहाण्याने तिने पतीचे पाय पकडले, पण माफी मागण्यासाठी नव्हे, तर आणखी एक कांड करण्यासाठी.

वाचा: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे 7 तासात 2 वेळा शारीरिक संबंध, शेवटी जीव गेला पण बॉयफ्रेंड…

सालीने पतीचे पाय ओढून…

सालीने पतीचे पाय ओढून त्याला पाडलं, त्यानंतर भावोजीही धावत आला आणि त्याने साडूचा गळा दाबून त्याला ठार मारलं. त्यानंतर त्या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण मृतकाच्या मुलाने जेव्हा आपल्या वडिलांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

मुलाने ओरडून सर्वांना बोलावलं

पोलिसांनी सांगितलं की, सोमवारी रात्री उशिरा मजुरी करून सहबुल घरी परतला तेव्हा त्याने पत्नीला भावोजीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. याचा विरोध केल्यावर पत्नीने पतीचा पाय पकडून त्याला पाडलं. त्यानंतर तिच्या प्रियकराने गळा दाबून सहबुलला ठार मारलं. नंतर मृतदेह बाहेर फेकून दिला. मृतक सहबुलचा मोठा मुलगा अताउल याने लोकांना बोलावून संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि सांगितलं की, आई आणि मामा (भावोजी) यांनी मिळून धमकी दिली की जर पोलिसांना सांगितलं तर तुलाही मारून टाकू.

सालीला सोडून भावोजी फरार

मंगळवारी सकाळी माहिती मिळताच एसआय मुकेश कुमार आणि रजनीश कुमार पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले. त्यांना मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. तसेच आरोपी महिलेला अटक केली, परंतू भावोजी अजूनही फरार आहे.