धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे 7 तासात 2 वेळा शारीरिक संबंध, शेवटी जीव गेला पण बॉयफ्रेंड…
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा शारीरिक संबंधानंतर मृत्यू झाला आहे. आता नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या...

प्रेम आंधळं असतं असे अनेकदा बोलले जाते. कधीकधी प्रेमात माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर गंभीर होतो. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात घडला आहे. एका किशोरवयीन मुलीने तिच्या प्रियकरासोबत रात्र घालवली, पण ही रात्र तिच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
कुटुंबीय गेले होते बाहेर
मध्ये प्रदेश येथील कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी ही किशोरवयीन मुलगी होती. तिचं कुटुंब एका नातेवाईकांच्या घरी लग्न समारंभासाठी कानपूरला गेलं होतं. त्यावेळी ती घरी एकटी होती. या संधीचा फायदा घेत तिचा प्रियकर, कुलदीप कुमार उर्फ शोभित, रात्री तिच्या घरी पोहोचला. कुलदीप हा तिच्या गावापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या नेवाडा गावचा रहिवासी आहे. गर्लफ्रेंडने बोलावले म्हणून तो रात्री शिवरापूरला आला.
शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या
त्या रात्री मुलीने आपल्या प्रियकरासोबत वेळ घालवला. कुलदीपने तिचे कपडे काढले आणि शारीरिक संबंध ठेवले. त्याने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या आणि दोनदा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सुमारे सात तास ती विवस्त्र अवस्थेत होती. यामुळे तिला थंडी लागली आणि तिचं शरीर ताठलं. तिची अवस्था बिघडत असल्याचं पाहून कुलदीपने तिथून पळ काढला. त्यानंतर त्या मुलीचा मृत्यू झाला.
पोलिसात तक्रार दाखल
मुलीचं कुटुंब घरी परतलं. सकाळी त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. मुलीचा अर्धनग्न मृतदेह बेडवर पडलेला होता. कुटुंबाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले. मुलीची भाची, जी त्या रात्री घरी होती, तिने पोलिसांना प्रियकर घरी आल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कुलदीपला अटक केली. पोलीस चौकशीत कुलदीपने सांगितलं की, त्याची गर्लफ्रेंड त्या रात्री घरी एकटी होती. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो तिच्या घरी पोहोचला आणि रात्रभर तिथे थांबला. पण सकाळी तिची तब्येत बिघडल्याचं दिसताच त्याने तिथून पळ काढला.
