केळीवाल्याला 500ची नकली नोट दिली आणि आरोपीचं बिंग फुटलं, पोलिसांना मिळाल्या 13 हजारांच्या नकली नोटा

केळी विक्रेत्याने प्रकार उघडकीस आणत कल्याण महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 13 हजाराच्या नकली नोटा जप्त केल्या.

केळीवाल्याला 500ची नकली नोट दिली आणि आरोपीचं बिंग फुटलं, पोलिसांना मिळाल्या 13 हजारांच्या नकली नोटा
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 10:52 PM

किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंकुश सिंह असे या आरोपीचे नाव आहे. तो दिल्लीत रॅपिडो बाईक चालवितो. तो मुंबईत आपल्या नातेवाईकाकडे आला होता. तो पुन्हा दिल्ली जात असताना कल्याण रेल्वे स्टेशनवर एका केळी विक्रेत्याला त्याने 500 ची नकली नोट दिली आणि चाळीस रुपयांची केळी घेऊन उरलेले पैसे तो केळीवाल्याकडून घेऊन गेला. थोड्या वेळानंतर केळीवाल्याला ही नोट नकली असल्याचं समजलं. त्याने आधी त्या आरोपीचा शोध घेतला. मात्र तो मिळाला नाही. त्याने हा प्रकार उघडकीस आणत कल्याण महात्मा फुले पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी स्टेशन परिसरात आरोपीचा शोध घेतला.

आरोपीकडे सापडल्या 100, 200 आणि 500 रुपयांच्या नकली नोटा

निरीक्षक महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शैलेश साळवी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी आरोपी अंकुश सिंहला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून तब्बल 13 हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यात 100, 200 आणि 500 रुपयांच्या नकली नोटांचा समावेश होत्या. याविषयी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या नोटा दिल्लीमधील एका व्यक्तीने बाजारात चालवण्यासाठी दिल्या होत्या.

या सर्व नोटा चालवल्यानंतर त्याला पैसे मिळणार असल्याचं सांगितलं. दिल्लीतील आरोपी आपल्याला 10 हजार खऱ्या नोटा मिळवण्यासाठी 25 हजाराच्या नकली नोटा देणार असल्याचे त्याने पोलिसाला सांगितले. सध्या या प्रकरणात कल्याण महाात्मा फुले पोलीस आणि एनआयएने मुख्य सूत्रधारचा शोध सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.