Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : मृत्यूनंतर आधार कार्डचे काय होणार? काय सरकारी योजनांचा फायदा तुमच्या वारसांना मिळणार?

Aadhaar हा 12 अंकांचा एक युनिक क्रमांक आहे. यामध्ये तुमचे नाव, पत्ता आणि फिंगरप्रिंट यांची माहिती देण्यात येते. विना आधार कार्ड तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही.

Aadhaar Card : मृत्यूनंतर आधार कार्डचे काय होणार? काय सरकारी योजनांचा फायदा तुमच्या वारसांना मिळणार?
आधार कार्डचा गैरवापराला आळा घाला
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 2:47 PM

सध्याच्या जमान्यात आधार कार्ड हा जरुरी दस्तावेज आहे. प्रत्येक सरकारी आणि खासगी कामासाठी आधार हे महत्वाचे कागदपत्र ठरते. आधार 12 अंकांचा एक खास क्रमांक असतो. यामध्ये तुमचे नाव, पत्ता आणि फिंगरप्रिंट असा तपशील समाविष्ट असतो. विना आधार कार्ड तुम्हाला सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. गॅस कनेक्शनपासून ते इतर अनेक सबसिडी मिळविण्यापर्यंत आधाराचा उपयोग होतो. तर बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत दाखला घेण्यापर्यंत आधार कार्डचा वापर करण्यात येतो. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढावल्यास, त्याच्या आधार कार्डचे काय होते, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या आधारच्या मदतीने तुम्हाला सवलती सुरु ठेवता येतात का?

मयताच्या आधारचे काय करावे?

UIDAI प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड देण्यात येते. आता तर जन्मलेल्या बाळाचे सुद्धा आधार कार्ड तयार करता येते. आधार कार्ड देण्याची व्यवस्था युआयडीएआयने केली आहे. पण आधार कार्ड रद्द करण्याची अथवा मयत व्यक्तीचे आधार कार्ड सरेंडर करण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती कायम असते. अनेकदा व्यक्ती मयत झाल्यानंतर सुद्धा काही जण त्याचे अनुदान, रेशन लाटतात.

हे सुद्धा वाचा

मग उपाय तरी काय

आधार कार्ड सरेंडर अथवा ते रद्द करता येत नाही. पण ते लॉक करता येते. लॉक केल्यानंतर दुसरी व्यक्ती आधार कार्डचा डेटा एक्सेस करु शकत नाही. त्यासाठी आधार कार्ड अगोदर अनलॉक करावे लागेल. तर ज्यांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांनी या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी.

असे करा आधार कार्ड लॉक

  1. सर्वात अगोदर UIDAI ची अधिकृत वेबसाईट uidai.gov.in ला भेट द्या
  2. आता My Aadhaar Services वर जा. Lock/Unlock Biometrics पर्याय निवडा
  3. या नंतर नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी लॉगिन करण्यासाठी 12 अंकांचा आधार क्रमांक नोंदवा.
  4. कॅप्चा कोड नोंदवा. आता Send OTP वर क्लिक करा.
  5. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डेटाला लॉक/ अनलॉक करण्याचा पर्याय दिसेल. त्याची निवड करा.
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.