AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात तृतीयपंथी ‘देवमामा’चा संशयास्पद मृत्यू, घरातील सोन्याचे दागिनेही गायब

मृतावस्थेत आढळला, तेव्हा त्याच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी घातल्याने चोरीच्या उद्देशाने देवमामाची हत्या झाली असल्याचा संशय बळावला आहे.

कोल्हापुरात तृतीयपंथी 'देवमामा'चा संशयास्पद मृत्यू, घरातील सोन्याचे दागिनेही गायब
कोल्हापुरात तृतीयपंथीयाचा मृत्यू
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 21, 2021 | 3:24 PM
Share

कोल्हापूर : तृतीयपंथीयाच्या संशयास्पद मृत्यूमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. सतीश पवार उर्फ देवमामा असं मृत तृतीयपंथीयाचे नाव आहे. त्याच्या घरातील सोन्याचे दागिनेही गायब झाल्याने चोरीच्या उद्देशाने देवमामाची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील शिये गावात ही घटना घडली. सतीश पवार उर्फ देवमामा असं मृत तृतीयपंथीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सतीश पवारच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. तो मृतावस्थेत आढळला, तेव्हा त्याच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी घातल्याने चोरीच्या उद्देशाने देवमामाची हत्या झाली असल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

केरळात पहिली ट्रान्सजेंडर विधानसभा उमेदवार मृतावस्थेत

दुसरीकडे, केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी अॅलेक्सही (Ananya Kumari Alex) राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोच्चीमधील घरात अनन्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अनन्या कुमारी ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकीही होती.

आत्महत्या केल्याचा संशय

अनन्याने 2020 मध्ये कोच्चीमधील खासगी रुग्णालयात वजायनोप्लॅस्टी शस्त्रक्रिया केली होती. मात्र वर्षभरानंतरही तिला आरोग्याच्या कुरबुरी जाणवत होत्या. ती दीर्घ काळ एका जागी उभी राहू शकत नसे. शारीरिक तक्रारींमुळे तिला काम करण्यात अडथळे येत होते. याच कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शस्त्रक्रियेत चुका झाल्याचा दावा

शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात झाला, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तिचे पार्थिव एर्नाकुलम शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

विधानसभा निवडणुकीत पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार, RJ अनन्या कुमारी राहत्या घरी मृतावस्थेत

बाळाचं अपहरण, नंतर हत्या करुन खाडीत पुरलं, पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीचं अमानवीय कृत्य

(Kolhapur Transgender Devmama aka Satish Pawar found dead at home)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!