AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अपघात झाला… तो बसलेला असतानाच कारने पेट घेतला अन्… नगर–मनमाड महामार्गावर भयंकर दुर्घटना, काहीच उरलं नाही

कोपरगावजवळ नगर-मनमाड महामार्गावर रात्री भीषण अपघात झाला. खाजगी बस आणि कारच्या धडकेने कारने पेट घेतला, यात कारचालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझली.

आधी अपघात झाला... तो बसलेला असतानाच कारने पेट घेतला अन्... नगर–मनमाड महामार्गावर भयंकर दुर्घटना, काहीच उरलं नाही
नगर–मनमाड महामार्गावर भयंकर दुर्घटना
| Updated on: Nov 15, 2025 | 10:59 AM
Share

कोपरगाव तालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती जवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर बसमधील काही जण जखमी झाले. हायवेवरून जात असताना कार आणि बसची धडक झाली. मात्र ती एवढी भीषण होती ती तत्क्षणी कारने अचानक पेट घेतला आणि बघता बघता ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सगळं जळून खाक झालं.  या भयानक आगीमध्ये कारचालकाचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातानंतर हायवेवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी झाली होती. मुजाहिद शेख (वय 31) असे मृत चालकाचे नाव असून त्याच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती जवळ काल रात्री 10 च्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गावरून जात असताना कार आणि खाजगी बसची जोरदार धडक झाली. कारने लगेच पेट घेतला आणि मोठी आग लागली.

एमएच 01 क्यूसी 3516 क्रमांकाची लक्झरी बस ही कोपरगाव येथून येवलाच्या दिशेने जात होती. मात्र ती बस भास्कर वस्तीजवळ येताच समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. त्यामुळे कारला आग लागली आणि त्यात बसलेल्या कारचालक मुजाहिद शेख हा गाडीतच अडकला आणि आगीमुळे होरपळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बचावासाठी नागरिकांनी घेतली धाव

तर या धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघात होताच प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला. अपघाताचे वृत्त समजताच कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अग्निशामक दल तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले. अखेर 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही पथकांनी संयुक्तपणे काम करत त्या कारला लागलेली आग विझवण्यात यश मिळवले. पण तोपर्यंत कारचालकाचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान अपघातामुळे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोपरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला