मूल होत नाही म्हणून बायकोला मित्रासोबत संबंध ठेवण्याची बळजबरी, नगरमध्ये पतीला अटक

मूल होत नाही म्हणून पतीनेच आपल्याला जबदस्ती त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप पत्नीने केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पतीच्या मदतीने त्याच्या मित्रानेच विवाहितेवर अत्याचार केले

मूल होत नाही म्हणून बायकोला मित्रासोबत संबंध ठेवण्याची बळजबरी, नगरमध्ये पतीला अटक
पतीच्या संमतीने मित्राकडून विवाहितेवर अत्याचार
कुणाल जायकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Sep 27, 2021 | 8:52 AM

अहमदनगर : मूल होत नाही म्हणून पत्नीला जबदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली आहे. विकृतीचा कळस गाठणारा हा प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे.

काय आहे प्रकरण?

मूल होत नाही म्हणून पतीनेच आपल्याला जबदस्ती त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप पत्नीने केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पतीच्या मदतीने त्याच्या मित्रानेच विवाहितेवर अत्याचार केले. पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मुंबईत पतीकडूनच पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल

दुसरीकडे, विवाहितेवर बलात्काराचा व्हिडीओ शूट करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी महिलेच्या पतीलाही बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीचे अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घटस्फोटासाठी ब्लॅकमेल करत पतीनेच ते व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील देवनार भागात ही घटना घडल्याची धक्कादायक माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

देवनारमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिला धमकी दिली, की जर त्याला 5.20 लाख रुपये दिले गेले नाहीत, तर तो हे बलात्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.

नवऱ्याकडूनही ब्लॅकमेल

महिलेने आरोपी ब्लॅकमेलरला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीने ते व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. आपल्या पत्नीला आधार देण्याऐवजी पतीनेही तिलाच ब्लॅकमेल करुन घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर पतीने पत्नीचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशातून पतीला बेड्या

आरोपी पती मुंबईहून उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील त्याच्या घरी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून पकडले. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार, खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सचा बलात्कार

दुसरीकडे, मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीच्या एका मित्राने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने या पार्टीसाठी मुलीलादेखील बोलावलं होतं. ते सर्व मढ परिसरातील हॉटेलबाहेर भेटले. त्यांनी तिथे वाढदिवस साजरा केला. ते त्या ठिकाणी गाडीतून पोहोचले होते. त्यांनी केक कारमध्ये ठेवून वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीच्या दोन इन्स्टाग्राम मित्रांनी गाडीच्या आत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती जागा सोडल्यानंतर मुलगी मालाड भागातील एका मित्राच्या घरी गेली. पण तिथे त्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी तिथल्या घरातून कसंबसं बाहेर पडली. ती दुसर्‍या मित्राच्या घरी गेली. तिथे त्याही मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

मुंबईत विवाहितेवर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन पतीला पाठवला, पतीने व्हायरल केला

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें