AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक दिवसाच्या बाळासह काकू कोवळ्या उन्हात बसली, मिनिटभर दुसऱ्या बाईकडे सोपवलं, आणि…

बाळाची काकू बाळाला रुग्णालयातील परिसरात कोवळ्या उन्हात घेऊन बसली होती. यावेळी कपडे वाळायला टाकायचे म्हणून बाळाला त्याच्या काकूने एका महिलाकडे सुपूर्द केले. मात्र पुढच्या काही मिनिटात या बाळाला घेऊन त्या महिलेने पळ काढल्याचा आरोप काकूने केला आहे.

एक दिवसाच्या बाळासह काकू कोवळ्या उन्हात बसली, मिनिटभर दुसऱ्या बाईकडे सोपवलं, आणि...
सांकेतिक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 08, 2022 | 7:15 AM
Share

जालना : रुग्णालयात परिसरातून नवजात बाळाची चोरी (New Born Baby Kidnap) झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बाळाची काकू त्याला कोवळ्या उन्हात घेऊन बसली असताना हा प्रकार घडला. कपडे वाळत टाकण्यासाठी काकूने बाळाला एका महिलेकडे सोपवले, मात्र पुढच्या काही मिनिटांतच संबंधित महिला बाळासह पसार झाल्याचा आरोप केला जात आहे. जालना शहरात (Jalna) हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. हे बाळ अवघ्या एक दिवसाचं आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालना शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात भरदिवसा बाळचोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

भरदिवसा रुग्णालयातून बाळ चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

एक दिवसाच्या बाळाची चोरी

रुग्णालयातून सकाळी एक दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. रुकसाना शेख या महिलेची जालना शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसुती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

नेमकं काय घडलं?

दरम्यान सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास या बाळाची काकू बाळाला रुग्णालयातील परिसरात कोवळ्या उन्हात घेऊन बसली होती. यावेळी कपडे वाळायला टाकायचे म्हणून बाळाला त्याच्या काकूने एका महिलाकडे सुपूर्द केले. मात्र पुढच्या काही मिनिटात या बाळाला घेऊन त्या महिलेने पळ काढल्याचा आरोप काकूने केला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला

बस प्रवासातील ओळखीतून बाळाचं अपहरण, पुण्यातील महिला अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात

साताऱ्यात घरात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, दुचाकीवरुन आलेल्या जोडप्यावर संशय

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली